Ankita Lokhande purple sindoor : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून अभिनेत्री अंकिता लोखंडे घराघरात पोहोचली. त्यानंतर ती मालिका, कार्यक्रम व हिंदी चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुकदेखील केले आहे. सध्या ती ‘लाफ्टर शेफ’ या कार्यक्रमामध्ये दिसून येत आहे. या शोचे सूत्रसंचालन भारती सिंह करत असून अंकिताबरोबर तिचा पती विकी जैनदेखील सहभागी झाला आहे. याआधी दोघंही ‘बिग बॉस’मध्येही दिसून आले होते. यावेळी दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात वाददेखील झाले होते. घराबाहेर आल्यानंतर दोघ घटस्फोट घेणार अशा चर्चादेखील सुरु झालया होत्या. मात्र असे काहीच न होता दोघांच्या नात्यामध्ये कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट झाले होते.
सध्या अंकिता व विकी दोघंही सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेले पाहायला मिळतात. त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ ते चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतात. अंकिताचा ग्लॅमरस लूक यामध्ये अनेकदा पाहायला मिळतो. या फोटो व व्हिडीओना चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंतीदेखील मिळते. तर काही वेळेस तिला ट्रोलदेखील केले जाते. नुकताच तिच्या बाबतीत पुन्हा हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
सध्या दोघंही एकत्रितपणे ‘लाफ्टर शेफ’ या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमामधील त्यांच्या परफॉर्मन्सने खूप पसंती मिळत आहे. मात्र तिने एका एपिसोडच्या केलेल्या लूकमुळे पुन्हा एकदा तिला ट्रॉलिंगचा सामना करावा लागला आहे. कार्यक्रमाच्या सेटवरुन विकी, अंकिता व अली गोनी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिघंही मजा-मस्करीच्या अंदाजात दिसत आहेत. यामध्ये अंकिताच्या लूकवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. तिच्या वेगळ्या लूकची सर्वत्र चर्चा होताना दिसून येत आहे. यामध्ये तिने लाल कुंकवाऐवजी जांभळ्या रंगाचे कुंकू लावले आहे.
हा व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी अंकिताला ट्रोल केले आणि काही प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, “फॅशनच्या नावावर काहीही करशील का?”, दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले की, “प्रसिद्धीसाठी काहीही करायचं असतं”. दरम्यान याचवेळी निया शर्माचादेखील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिने ओठांना काळ्या रंगाची लिपस्टिक लावलेली दिसून येत आहे. यावरुन नियालादेखील मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले होते.