Tharal Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, सायली प्रतिमाला जेवायला सांगताच प्रतिमा विचार करु लागते आणि जेवायला नंतर नकार देते. पण सायली स्वतःच्या हाताने प्रतिमाला जेवणाचा घास भरवते. आणि त्या नंतर प्रतिमा मात्र स्वतःच्या हाताने जेवू लागते. दुसरीकडे महीपत नागराजला इन्स्पेक्टरला दागिने घरात मिळाले याबद्दल उलट विचारणा करतो. साक्षीसुद्धा घरात दागिने कसे असं नागराजला विचारते. त्यावर नागराज पोलिसांना संशय आला चौकशी केली तर माझ्यामुळे तुझ्यापर्यंत पोलीस पोहीचतील म्हणून त्यांना खोटे सांगितल्याचे महीपतला सांगतो.
दागिने कुठे आहेत त्या विषयापेक्षा प्रतिमाचा विषय जास्त गंभीर असल्याचा नागराज महीपतला सांगतो. रविराज पूर्णा आईला झोपायला सांगताच पूर्णा आई आज शांत झोप लागणार असल्याचे सांगते. सायलीलासुद्धा कल्पना प्रतिमाला झोपायला न्यायला सांगते त्यावेळी सायली प्रतिमाबरोबर मी राहणार असल्याचे त्यांना सांगते. पण तन्वी स्वतः पुढे पुढे करताच प्रतिमा पुन्हा घाबरते. पूर्णाआई प्रतिमाला घाबरायचे नाही असं सांगत सायलीबरोबर येईल असे सांगते. दुसरीकडे महीपत व साक्षी प्रतिमाबद्दल अजूनही शंका घेत राहतात.
आणखी वाचा – Paaru Serial : पारूची प्रार्थना आदित्यला वाचवणार का?, अपघाताचं संकट अखेर टळणार का?, नक्की काय घडणार?
प्रतिमाला स्वतःच्या हाताने मारल्याचे महीपत साक्षीला सांगतो आणि ही प्रतिमा नसून तिच्यासारखी दिसणारी कुणीतरी असावी असंही महीपत साक्षीला पुढे बोलून दाखवतो. इथे पूर्णा आई व रविराज यांना जुन्या गोष्टी आठवतात आणि ते त्या आठवणीत रमतात. प्रतिमाही झोपत नसल्याने सायली तिला समजावते आणि जवळ घेते. त्यापुढे सायली तिच्यासाठी अंगाई म्हणते आणि तिला झोपवत असते. सायलीची अंगाई ऐकून घरातले सगळे खोलीत येऊन आणि हे दृश्य बघून खूप आनंदी होतात. सायली प्रतिमाबरोबर आहे म्हणजे अर्जुन त्याच्या खोलीत एकटाच असणार असं समजत तन्वी आनंदी होते. याच विचाराने तन्वी म्हणजेच प्रिया अर्जुनच्या खोलीत येते.
मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, सायली अर्जुनच्या खोलीत लाईट सुरु असल्याचे बघताच वरती यायला निघते, अर्जुनही दरवाजा उघडून तिला वरती आपल्या खोलीकडे येताना पाहतो. आता सायली तन्वी व अर्जुनला एकत्र खोलीत पाहणार का?, हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.