सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “मोठमोठ्या संकटांना हरवून इथे आलास आणि…”, सूरज चव्हाण मराठी इंडस्ट्रीमधून फुल्ल सपोर्ट, अभिनेता म्हणाला, “शिकलेल्या माणसांना…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 1, 2024 | 1:18 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 5 Update Utkarsh Shinde praised Suraj Chavan

: ‘बिग बॉस मराठी’मधील सूरज चव्हाणसाठी उत्कर्ष शिंदेची खास पोस्ट

Bigg Boss Marathi Season 5 :  ‘बिग बॉस’ मराठीच्या नवीन पर्वाची धमाकेदार सुरुवात झाली आहे. शोचा विजेता ठरण्यासाठी, टास्क जिंकण्यासाठी शह-कटशह, ठस्सन सुरु झाली आहे. यंदाच्या पर्वात वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतली.  यापैकी सूरजच्या एण्ट्रीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (Bigg Boss Marathi 5 Utkarsh Shinde on suraj chavan)

‘बिग बॉस’च्या घरातील सूरज चव्हाणच्या एण्ट्रीबद्दल उत्कर्ष शिंदेने भाष्य केलं आहे. सूरजचा या घरात आल्यानंतरचा नवीन स्वॅग पाहायला मिळत आहे. सूरजच्या नवीन स्वॅगचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे आणि या प्रोमोमध्ये तो आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. त्याच्या याच स्टाईलबद्दल उत्कर्षने पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये उत्कर्षने सूरजचे कौतुक करत असं म्हटलं आहे की, सूरज तू मोठमोठ्या संकटांना हरवून इथपर्यंत आला आहेस. तू सच्चा आहेस. बाकी स्पर्धकांसारखं चेहरे बदलणारा नाहीस. शिकलेल्यांना माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हेच आठवत नसेल तर त्यांचं शिक्षण चुलीत घाला” तसेच यापुढे त्याने इतर स्पर्धकांना उद्देशून तूम सीरफ डरा सकते होण हरा नही सकते”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “मर्यादा सोडून चालत नाही आणि…”, वर्षा उसगांवकरांच्या पाठिशी सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, म्हणाला, “खूप वाईट आहे की…”

काही दिवसांपूर्वी उत्कर्षने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने असं म्हटलं होतं की, “कंटस्टंट (स्पर्धक) छान किंवा वाईट ठरवण्यात मज्जा नाही. हा (सुरज चव्हाण) असाच रॉ, फ्री, मोकळा, निर्भीड खेळला तर बऱ्याच जणांना याला सांभाळायचं कसं हे कळणार नाही. त्यामुळे सुरज बिग बॉसमध्ये मज्जा आणेल. हे रसायन वेगळं आहे”.   

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकरांनंतर निक्की तांबोळीचा आर्यावर निशाणा, नको नको ते बोलली, अरबाज-वैभव यांच्याबरोबरही वाद

त्यामुळे यंदाच्या ‘बिग बॉस’ मराठीच्या सीझनमध्ये चार सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहेत. यामध्ये अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण आणि घन:श्याम दराडे यांचा समावेश आहे. त्यामुळे या घरात आता कलाकार विरुद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर असा वाद झाल्याने ‘बिग बॉस’च्या घरात काय होणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वात सूरज आता त्याची काय नवीन चाल खेळणार? त्याच्या नवीन शैलीने तो या खेळात काय रंगत आणणार? हे आगामी भागांमधून पाहायला मिळणार आहे.   

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 NewsBigg Boss Marathi 5 Utkarsh Shinde on suraj chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
bigg boss marathi season 3 gulabi sadi song

Bigg Boss Ott : 'बिग बॉस ओटीटी'च्या घरात 'गुलाबी साडी' फेम संजू राठोड, शोमधील लाइव्ह कॉन्सर्टमध्ये थिरकले स्पर्धक, व्हिडीओ तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.