‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, प्रतिमाला पूर्णा आई बोलायला सांगते पण ती बोलत नसल्याने सायलीला पूर्णा आई प्रतिमाला बोलायला सांगण्याची विनंती करते. शिवाय प्रतिमाने एकदा हाक मारली की, मी मरायला मोकळी अशीही शेवटची इच्छा पूर्णा आई सायलीला बोलून दाखवते. प्रतापसुद्धा प्रतिमाला पूर्णा आईशी बोल असं सांगताच सायली तिची वाचा गेली आहे असं सांगते. अस्मिता तिला पुढे बोलायला सांगताच सायली प्रतिमाला तिचा भूतकाळ काहीच आठवत नसल्याचेसुद्धा सांगते. हे ऐकताच पूर्णा आईला धक्का बसतो, ती देवी आईला कसली परीक्षा घेत आहेस असं विचारते. (Tharal Tar Mag Serial Update)
माझ्या लेकीची तपश्चर्या अजून सुरुच आहे असं बोलत पूर्णा आजी काळजी व्यक्त करते. तेव्हा सायली पूर्णा आजीची समजूत काढते. आपण देवी आईचे आभार मानले पाहिजेत, सगळ्यांनी आशा सोडूनही प्रतिमा आत्या परत आली आहे, तुमचे प्रेम जिंकले आहे, आईची माया जिंकली आहे असंही सायली पूर्णा आईला सांगते. सायली प्रतिमा तब्बल एकवीस वर्षांनी परतल्याचे पूर्णा आईला सांगते. पूर्णा आई सायलीचे उपकार झाले सांगत आभार मानते पण सायली आपल्या माणसाचे उपकार नाहीत असे समजावते. प्रतापसुद्धा प्रतिमाला इथे राहून सर्व हळूहळू आठवेल असं बोलतो. अस्मिता प्रतिमाला फोटो पाहून सर्व आठवेल असं सांगताच प्रतिमा फोटोकडे पाहते आणि जरा जास्तच घाबरते.
चैतन्य तिला आता काही प्रश्न न विचारण्याची विनंती करतो कारण त्यामुळे प्रतिमाला स्ट्रेस येऊ शकतो. प्रतिमा जिवंत आहे तर रविराजला मिळालेली डेड बॉडी कुणाची होती आणि ती प्रतिमा असल्याचा डीएनए कसा मॅच झाला, असा प्रश्न उपस्थित प्रताप करतो आणि रविराजला फोन करुन ताबडतोब बोलवून घेण्यास सांगतो. अर्जुनचा रविराजला फोन येताच तन्वी नागराजकडे केसची पुन्हा तारीख मागितली तर नसल्याची शंका व्यक्त करते. रविराज सगळ्यांना लगेच सुभेदारांकडे निघायचं आहे असं सांगून तातडीने निघतो. इथे सायलीला प्रतिमा कशी भेटली ही सर्व हकीकत सायली पूर्णा आईला सांगते. कल्पना मात्र त्यावेळी तू तर कुसुमताईकडे गेली असल्याचे सायलीला विचारते, अर्जुन पुढे बोलताच पूर्णा आई ही देवी आईचीच इच्छा असल्याचे सांगते, इतक्यात रविराज सगळ्यांना घेऊन तिथे पोहोचतो. रविराजला चमत्कार घडल्याचे पूर्णा आई सांगते. रविराज प्रतिमाला बघतो आणि थक्कच होतो. तिला पाहताच त्याच्या तोंडून प्रतिमा शब्द येताच नागराज, सुमन व तन्वी आश्चर्यचकित होतात.
तन्वी व नागराजला प्रतिमा मेल्याच्या खोट्या नाटकाची आता भीती वाटू लागते. नागराज आपल्याशी महीपत प्रतिमाला मारल्याचे खोटे बोलल्याचे स्वतःशीच बोलतो. रविराज मला रोजच्यासारखा भास तर होत नाही ना असं प्रतिमाला बघून बोलतो. तन्वी मुद्दाम मुलीचे नाटक करत प्रतिमाला मिठी मारते आणि सुमनसुद्धा आनंद व्यक्त करते. पण प्रतिमा घाबरुन सायलीला बिलगते. आता मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, सायली प्रतिमाला या घरात प्रेमच मिळणार असून मनाची तयारी करायला प्रतिमाला सांगते. तन्वी सायलीला गांभीर्य नसल्याचे पूर्णा आईला सांगताच गांभीर्य तुलाच नसल्याचे तन्वीला सांगते.