मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सातव्या मुलीची…’ मालिकेला वेगळंच वळण, नेत्राच्या बाळाला इंद्राणीपासूनच धोका? इंद्राणी बाळाला मारण्याचे प्रयत्न करणार का?

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 29, 2024 | 9:39 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Saatvyaa mulichi satvi mulgi serial update Netra's baby being in danger from Indrani know more

'सातव्या मुलीची...' मालिकेला वेगळंच वळण, नेत्राच्या बाळाला इंद्राणीपासूनच धोका? इंद्राणी बाळाला मारण्याचे प्रयत्न करणार का?

गेले काही दिवस ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत अनेक नवनवीन ट्विस्ट येत असल्याचे पाहायला मिळत आहे.मालिकेत गेल्या काही दिवसांपासून नेत्राचे गरोदर दाखवण्यात आले आहे. यामुळे राजाध्यक्ष कुटुंबीय खूपच आनंदी होते. पण तिच्या पोटात वाढत असलेलं बाळ हे विरोचकाचाच एक अंश आहे हे कळताच सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. आधी तिला याबाबत माहिती नसते. मात्र नुकत्याच झालेल्या भागातून तिच्या पोटातील बाळ हे विरोचकाचे अंश असल्याचा उलगडा झाला आहे. यामुळे राजाध्यक्ष कुटुंबियांना मोठा धक्काच बसला आहे. त्रिनयना देवीवर विश्वास ठेवत तिच्यावर असलेल्या श्रद्धेमुळे नेत्रा व इंद्राणी या परिस्थितीत खचून जात नाहीत. पण आता मालिकेत येणाऱ्या एका नवीन वळणामुळे प्रेक्षकांना मालिकेत पुढे काय होणार याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.

नेत्राच्या पोटात विरोचकाचा अंश असल्याने राजाध्यक्ष कुटुंबीय नेत्राला गर्भपात करायला सांगत आहेत. मात्र नेत्राचा आईपणाचा पहिलाच अनुभव असल्याने ती गर्भपात करण्यास विरोध करत आहे. अशातच रुपाली नेत्राला इंद्राणीविरुद्ध भडकवण्याचे काम करत आहे. इंद्राणी तुझ्या बाळाला जीवे मारेल अशी भीती रुपाली नेत्राला वारंवार घालत आहे. त्यामुळे आता देवीआईच्याच लेकींमध्ये फूट पडत आहे. एकीकडे रुपाली नेत्राला तिच्या पोटात विरोचकाचा अंश असल्यावरून तिला सतत डिवचत आहे. तर दुसरीकडे इंद्राणी, अद्वैत सह राजाध्यक्ष कुटुंबीय नेत्राला तिचे बाळ नष्ट करण्यासाठी सांगत आहेत. यामुळे नेत्राला इंद्राणी तिच्या बाळाला खरंच मारेल की अशी भीती वाटत आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – अभिजीत सावंत, छोटा पुढारी, परदेसी गर्ल व निक्की तांबोळीची ‘बिग बॉस मराठी’मध्ये धमाकेदार एन्ट्री, एकमेकांशी कसं जुळवून घेणार?

अशातच मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामधून इंद्राणी नेत्राला काहीतरी खायला देऊन मारणार की काय असं दाखवण्यात आले आहे. या नवीन प्रोमोमध्ये शेखर व अद्वैत नेत्रा व इंद्राणी यांनी गर्भपात किंवा विरोचकाचा अंश हा विषय बाजूला ठेवून एकमेकींशी बोलल्या तर या सगळ्या परिस्थितीवर काहीतरी तोडगा निघेल असं म्हणत असतात. तेवढ्यात इंद्राणीही प्रयत्न करायलाच हवेत असं म्हणते. यानंतर इंद्राणी एक पदार्थ बनवून नेत्राला खायला देते आणि तो पदार्थ नेत्रा खातेदेखील. मात्र यात नेत्राच्या बाळाला मारण्यासाठी काही मिसळले असल्याची भीती तिला वाटत आहे.

आणखी वाचा – अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरुषोत्तमदादा पाटील व वैभव चव्हाण ‘बिग बॉस मराठी’च्या घरात धुमाकूळ घालण्यास सज्ज, कोण कोणावर भारी पडणार?

त्यामुळे आता इंद्राणीच नेत्राच्या बाळाला नष्ट करणार का? असा प्रश्न पडला आहे. तसेच गेले काही दिवस देवीआईच्या लेकींमध्ये फूट पडल्याचे दिसत आहे. हीच फूट कायम ठेवण्यात रुपाली यशस्वी होईल का? की नेत्रा व इंद्राणी यातून काहीतरी सुवर्णमध्य काढतील? हे प्रेक्षकांना आगामी भागांत पाहायला मिळणार आहे.

Tags: marathi entertainment newsmarathi serialSaatvyaa mulichi satvi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Paaru Serial Update

आदित्य व हरीशची भेट होणार?, पारूने लपवलेलं सत्य सर्वांसमोर येणार, अहिल्यादेवींच्या आदेश नेमका काय असणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.