प्रसिद्ध कॉमेडियन, अभिनेता कृष्णा अभिषेक हा लोकप्रिय सेलिब्रिटी म्हणून ओळखला जातो. तो अभिनेता गोविंदाचा भाचा आहे. त्यामुळे अनेकदा त्याच्यावर घराणेशाहीचे आरोप देखील केले जातात. परंतु गोविंदा आणि कृष्णामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मतभेद सुरु आहेत. हे मतभेद इतक्या टोक्याचे आहेत की गेल्या काही वर्षांपासून दोघं एकमेंकासमोरही आलेले नाहीत. अलीकडेच, कृष्णा अभिषेकची बहीण आणि टीव्ही अभिनेत्री आरती सिंहने भाऊ आणि मामाच्या भांडणावर उघडपणे बोलले आहे.
बॉलीवूडचा सुपरस्टार गोविंदा तिच्या लग्नाला आल्याबद्दल आरती सिंगने पहिल्यांदा आनंद व्यक्त केला. आरतीने खुलासा केला की, भाऊ आणि मामाच्या भांडणात ती कधीच सामील झाली नाही. गोविंदा तिच्यावर खूप प्रेम करतो आणि नेहमीच तिची काळजी घेतो. याबद्दल अभिनेत्री म्हणाली की, “माझ्या लग्नात माझे काका आले याचा मला सर्वाधिक आनंद झाला. थोड्या वेळासाथी आला होता. पण तो आला. त्याचे येणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. कारण खूप दिवसांनी आम्ही सगळे एकत्र भेटलो होतो”.
आणखी वाचा – “मला ट्रॉफी नको पण…” ‘बिग बॉस’च्या घरातील ‘या’ स्पर्धकाची अनोखी मागणी, म्हणाला, “ट्रॉफीचं लोणचं…”
आरतीने पारस छाबराच्या पॉडकास्टमध्ये याचा खुलासा केला. तेव्हा तिने सांगितले की, “माझ्या मामाला पाहताच मला खूप आनंद झाला. माझा त्याच्याशी कधीच संवाद झाला नाही. मी त्याच्यावर खूप प्रेम करते आणि मी नेहमी सर्वांना सांगतो की, त्यांनी माझी खूप काळजी घेतली आहे. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले आहे. मी कधीही त्यांच्या भांडणात सहभागी झाली नाही. त्यांच्या भांडणात मी कधीच भाग घेतला नव्हता. पण तो लग्नाला आला याचा मला आनंद आहे”.
दरम्यान, आपल्या विनोदाचं टायमिंग, अभिनय या सगळ्यामुळेच कृष्णाने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली आहे. व्यावसायिक जीवनात भरभरून यश मिळवलेल्या कृष्णाचं खासगी आयुष्य मात्र वाद- विवादांनीच भरलेलं आहे. कृष्णा हा अभिनेता गोविंदाचा भाचा असून मामा-भाच्याचा वाद कोणापासूनही लपलेला नाही. तेव्हापासून काका-पुतण्यामध्ये खटके उडाले असून दोन्ही कलाकार एकमेकांशी बोलत नाहीत.