मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : साचलेल्या पाण्यातून वाट काढताना प्रसिद्ध दिग्दर्शकाची दमछाक, व्हिडीओद्वारे दाखवली परिस्थिती, म्हणाला, “गाडीची होडी आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 25, 2024 | 1:52 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi director Sameer Vidwans shared a video of him wading through water accumulated due to rain in Mumbai

Video : साचलेल्या पाण्यातून वाट काढताना प्रसिद्ध दिग्दर्शकाची दमछाक, व्हिडीओद्वारे दाखवली परिस्थिती, म्हणाला, "गाडीची होडी आणि…"

मुंबईसह संपूर्ण राज्यभरात आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे अनेक मुंबईकर या साचलेल्या पाण्यातून आपली वाट काढत आहेत.  प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी येथे आज ऑरेंज अलर्ट आहे. मागील काही तासांपासून सुमारे ३० ते ४० मिलिमीटर पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी पाणी भरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरीकांना अडचणीदेखील येत आहेत. याचबद्दल प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने एक व्हिडीओ शेअर करत उपरोधिक पोस्ट शेअर केली आहे.

‘आनंदी गोपाळ’, ‘डबलसीट’, ‘टाईमप्लीज’, ‘क्लासमेट्स’, ‘लोकमान्य’, ‘लग्न पहावे करून’ अशा बऱ्याच चित्रपटांमधून समीरने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. समीर अनेकदा त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन सामाजिक आणि राजकीय विषयावर भाष्य करत असतो.अशातच त्याने आजच्या पावसाबद्दलही एक पोस्ट शेअर केली आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं असून या साचलेल्या पाण्यातून समीर वाट काढत त्याच्या कामावर जात आहे. याचनिमित्ताने त्याने पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sameer Vidwans (@sameervidwans)

आणखी वाचा – “मला ट्रॉफी नको पण…” ‘बिग बॉस’च्या घरातील ‘या’ स्पर्धकाची अनोखी मागणी, म्हणाला, “ट्रॉफीचं लोणचं…”

समीरने गाडीतून बाहेर साचलेल्या पाण्याचा व्हिडीओ शेअर केला असून त्याने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओसह त्याने असं म्हटलं आहे की, “गाडीची होडी आणि मनाचं वल्हं करा आणि कामाला चला”. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्याच्या या व्हिडीओला व कॅप्शनला रिलेट केलं आहे. “सगळीकडे हीच परिस्थिती आहे, “बरोबर माझ्या खिडकीबाहेर पाहिल्यावर मलाही अशाच गोष्टी दिसतात” अशा कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा – ‘या’ दिवशी सुरु होणार ‘बिग बॉस’चे १८वे पर्व, सलमान खानच असणार होस्ट?, पहिल्या स्पर्धकाचे नावही समोर

दरम्यान,  प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी येथे ऑरेंज अलर्ट आहे. सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे विमान आणि लोकलवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. तर दुसरीकडे मुंबई शहरात धुवाधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. पावसामुळे पहिली ते बारावीच्या सर्व शाळा व महाविद्यालयांना अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Tags: marathi directormumbai rainMumbai Rain NewsSameer Vidwans
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
sara ali khan video

एअर होस्टेसच्या हातून सारा अली खानच्या ड्रेसवर ज्यूस पडला, अभिनेत्री रागाने थेट निघूनच गेली अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.