शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कलावंत ढोल-ताशा पथकातून आस्ताद काळेची एक्झिट, थेट पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाला, “माझा काहीही संबंध नाही”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 24, 2024 | 12:35 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Astad Kale Post

कलावंत ढोल-ताशा पथकातून आस्ताद काळेची एक्झिट, थेट पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाला, "माझा काहीही संबंध नाही"

सर्वत्र आता पुन्हा एकदा सणांची रेलचेल सुरु झालेली पाहायला मिळत आहे. अशातच काही दिवसांवर गणेशोत्सव आले आहेत. गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र धामधूम सुरु झालेली पाहायला मिळत आहे. मोठमोठ्या मिरवणुका, ढोल ताशांचे पथक यासाठी सज्ज होताना दिसत आहेत. दरवर्षी महाराष्ट्रात मुंबई-पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकींचा वेगळाच थाट अनुभवायला मिळतो. विशेषतः पुण्यात मराठी कलाकारही ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देतात. असेच एक कलाकारांचे ढोल ताशा पथक ‘कलावंत पथक’. (Astad Kale Post)

अजय पुरकर, आस्ताद काळे, सौरभ गोखले, श्रुती मराठे, शाश्वती पिंपळकर, प्राजक्ता हणमघर, माधवी सोमण, ज्योती मालशे, तेजस्विनी पंडित, हृषीकेश जोशी, प्रसाद ओक, ऋजुता देशमुख, पीयूष रानडे, मयूरी वाघ, अनुजा साठे, परी तेलंग, केतन क्षीरसागर, श्रीकार पित्रे, प्रसाद जवादे, राधिका देशपांडे, मधुरा देशपांडे, नूपुर दैठणकर, तेजश्री वालावलकर, अश्विनी कुलकर्णी, बिपीन सुर्वे ही कलाकार मंडळी पथकात आहेत. ही सर्व कलाकार मिरवणुकींमध्ये बेभान होऊन ढोल-ताशांचा गजर करताना दिसतात.

आणखी वाचा – अखेर सायलीने प्रतिमाचा शोध घेतलाच, सुभेदारांसमोर घेऊन येताच सगळे पाहतच बसले अन्…; लेकीला पाहून पूर्णा आजीलाही अश्रू अनावर

अशातच या कलावंत ढोल ताशा पथकातून आता एका मराठमोळ्या अभिनेत्याने एक्झिट घेतली असल्याचं समोर आलं आहे. याबाबतची पोस्ट त्या अभिनेत्याने सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. हा अभिनेता म्हणजे आस्ताद काळे. आस्तादने कलावंत पथक यामधून काढता पाय घेतला आहे. “नमस्कार. मी कलावंत पथक सोडलं आहे. या पथकाशी त्याच्या मिरवणुकांशी, वादनांशी माझा काहीही संबंध नाही. तेव्हा नवीन सभासद नोंदणी, तालमींचं वेळापत्रक, मिरवणुका इ. संबंधी मला संपर्क करु नये. धन्यवाद”, असं म्हणत त्याने पथकाला रामराम केला असल्याचं सांगितलं आहे.

आणखी वाचा – अप्पीची प्रगती आर्याला पाहवेना, अर्जुनलाही वाटतंय तिचं कौतुक, कामाच्या ओघात दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडणार का?

सध्या आस्ताद काळे कोणत्याच मालिकेमध्ये झळकताना दिसत नाही आहे. तर तो सध्या ‘मास्टर माईंड’ या नाटकाद्वारे रंगभूमी गाजवताना दिसत आहे. त्याच हे नाटक सध्या चांगलंच गाजत आहे. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावरुन नेहमीच काही ना काही शेअर करत तो न पटणाऱ्या मुद्द्यांवर भाष्यही करताना दिसतो.

Tags: astad kaleastad kale on kalawant pathakAstad Kale Postentertainmentmarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
sonakshi sinha one month anniversry

लग्नाला एक महिना पूर्ण होताच सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बालचा परदेशात रोमान्स, अभिनेत्रीने शेअर केले Inside Photos

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.