शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दुसऱ्या नवऱ्याच्या अफेअरबाबत दीपिका कक्करचा खुलासा, फोटोही केला शेअर, म्हणाली, “माझ्या सवतीबरोबर…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 22, 2024 | 4:55 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tv actress Deepika Kakkar shared a photo of husband Shoaib Ibrahim and said, he is busy with my sautan know more

दुसऱ्या नवऱ्याच्या अफेअरबाबत दीपिका कक्करचा खुलासा, फोटोही केला शेअर, म्हणाली, “माझ्या सवतीबरोबर...”

छोट्या पडद्यावरील गाजलेली अभिनेत्री दीपिका कक्कर सतत चर्चेत असते. ती अभिनयापासून दूर असली तरीही सोशल मीडियाच्या नेहमी प्रेक्षकांच्या संपर्कात असते. ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून ‘सिमर’च्या भूमिकेत प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. टेलिव्हिजन क्षेत्रातील ही लोकप्रिय जोडी दीपिका कक्कर व शोएब इब्राहिम दोघंही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. युट्यूबवर ते व्लॉगच्या माध्यमातून अपडेट देत असतात. ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलदेखील माहिती देत असते. अशातच तिने शेअर केलेला एक फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ईब्राहीमचा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये शोएब सोफ्यावर बसून फोन बघतताना दिसत आहे. तो फोनमध्ये इतका मग्न झाला होता की, दीपिका आपला फोटो काढत असल्याचेही त्याला जाणवले नाही. फोटो पोस्ट करताना दीपिकाने “माझ्या सवतीबरोबर खूप व्यस्त आहे” असं म्हटलं आहे. याबरोबरच तिने हसण्याचा इमोजीही शेअर केला आहे.  दीपिकाने हा फोटो आणि कॅप्शन मजेशीरपणे लिहिले आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

आणखी वाचा – भुवनेश्वरीची घरातून हकालपट्टी, ‘तुला शिकवीन…’ मालिकेत नवं वळण, कायमची घर सोडणार का?

‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून दीपिका व शोएब ही जोडी प्रथम प्रेक्षकांसमोर आली. या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. मालिका संपल्यानंतर काही वर्षानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण हे दीपिकाचे दुसरे लग्न आहे. दीपिकाने २०१३ साली रौनक सॅमसनबरोबर लग्न केले. तो पायलट होता. पण लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच दोघांमध्ये वाद होऊ लागले. त्यामुळे ही नाते संपविण्याचा निर्णय दीपिकाने घेतला. २०१५ मध्ये दीपिका व रौनक घटस्फोट घेऊन विभक्त झाले.

आणखी वाचा – “घटस्फोटामुळे मी खूप आनंदी”, किरण रावचं मोठं वक्तव्य, म्हणाली, “आमिरबरोबरचं नातं…”

दरम्यान, दीपिका व शोएब लग्नाच्या पाच वर्षानंतर आई-वडील झाले. गेल्या वर्षी जूनमध्ये दीपिकाने एका मुलाला जन्म दिला, त्याचे नाव रुहान आहे. दीपिका व शोएब रुहानबरोबरचे फोटो शेअर करत असतात आणि चाहत्यांना त्याच्याबद्दल काही अपडेट्स देत असतात. दीपिका व शोएबचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. शोएब सध्या टीव्ही शोमध्ये काम करत आहे, पण दीपिका बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही शोमध्ये काम करत नाही. 

Tags: Bollywood entertainment newsDeepika kakkarentertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
gurucharan singh on spiritual journey

‘तारक मेहता...’ फेम सोढीचा मोठा खुलासा, अखेर २५ दिवस गायब असण्यामागचं कारण सांगितलं, म्हणाले, “माझ्या जवळच्या...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.