छोट्या पडद्यावरील गाजलेली अभिनेत्री दीपिका कक्कर सतत चर्चेत असते. ती अभिनयापासून दूर असली तरीही सोशल मीडियाच्या नेहमी प्रेक्षकांच्या संपर्कात असते. ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून ‘सिमर’च्या भूमिकेत प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. टेलिव्हिजन क्षेत्रातील ही लोकप्रिय जोडी दीपिका कक्कर व शोएब इब्राहिम दोघंही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. युट्यूबवर ते व्लॉगच्या माध्यमातून अपडेट देत असतात. ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलदेखील माहिती देत असते. अशातच तिने शेअर केलेला एक फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ईब्राहीमचा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये शोएब सोफ्यावर बसून फोन बघतताना दिसत आहे. तो फोनमध्ये इतका मग्न झाला होता की, दीपिका आपला फोटो काढत असल्याचेही त्याला जाणवले नाही. फोटो पोस्ट करताना दीपिकाने “माझ्या सवतीबरोबर खूप व्यस्त आहे” असं म्हटलं आहे. याबरोबरच तिने हसण्याचा इमोजीही शेअर केला आहे. दीपिकाने हा फोटो आणि कॅप्शन मजेशीरपणे लिहिले आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – भुवनेश्वरीची घरातून हकालपट्टी, ‘तुला शिकवीन…’ मालिकेत नवं वळण, कायमची घर सोडणार का?
‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून दीपिका व शोएब ही जोडी प्रथम प्रेक्षकांसमोर आली. या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. मालिका संपल्यानंतर काही वर्षानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण हे दीपिकाचे दुसरे लग्न आहे. दीपिकाने २०१३ साली रौनक सॅमसनबरोबर लग्न केले. तो पायलट होता. पण लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच दोघांमध्ये वाद होऊ लागले. त्यामुळे ही नाते संपविण्याचा निर्णय दीपिकाने घेतला. २०१५ मध्ये दीपिका व रौनक घटस्फोट घेऊन विभक्त झाले.
आणखी वाचा – “घटस्फोटामुळे मी खूप आनंदी”, किरण रावचं मोठं वक्तव्य, म्हणाली, “आमिरबरोबरचं नातं…”
दरम्यान, दीपिका व शोएब लग्नाच्या पाच वर्षानंतर आई-वडील झाले. गेल्या वर्षी जूनमध्ये दीपिकाने एका मुलाला जन्म दिला, त्याचे नाव रुहान आहे. दीपिका व शोएब रुहानबरोबरचे फोटो शेअर करत असतात आणि चाहत्यांना त्याच्याबद्दल काही अपडेट्स देत असतात. दीपिका व शोएबचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. शोएब सध्या टीव्ही शोमध्ये काम करत आहे, पण दीपिका बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही शोमध्ये काम करत नाही.