‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, सायली अर्जुनला केस लढण्यासाठी खूप सपोर्ट करते. हताश झालेल्या अर्जुनचा ती आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करते. अर्जुन मात्र चैतन्यच्या सहा महिन्याच्या रद्द झालेल्या सनदीबद्दल चिंता व्यक्त करत असतो. पण सायली मात्र अर्जुनला धीर देते. अर्जुन सायलीला तुझ्यामुळे कामासाठी एनर्जी मिळत असल्याचे सांगतो. दुसरीकडे अर्जुन व सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या फाईलविषयी साक्षी प्रियाला विचारते. (Tharal Tar Mag Serial Update)
प्रिया साक्षीला गोरे बाईंना त्यासाठीच कामाला लावल्याचे सांगते. नाही केले काम तर काय?, असं उलट प्रिया साक्षीला विचारताच तिथे महीपत येऊन प्रियाला धमकावतो. त्यामुळे महिपतला घाबरुन प्रिया लगेच कामाला लागते असं सांगते. दुसरीकडे पूर्णा आई शिरा खायचा हट्ट धरतात पण कल्पना काही त्यांना देत नाही. पण सायली मात्र गुपचूप शिरा पूर्णा आईला देते. गोरे बाई अर्जुनच्या ऑफिसमध्ये असताना नेमका प्रियाचा कॉल कटकटी मॅडम नावाने येताच अर्जुन त्याबद्दल गोरे बाईंना विचारणा करताच.
यावर गोरे बाई घरमालकिणीचा नंबर असल्याच सांगतात. प्रिया गोरे बाईंना कामाबद्दल धमकावते. आणि तन्वी मुद्दाम अर्जुनच्या ऑफिसला भेटायला येते. तन्वीला टाळण्यासाठी अर्जुन चैतन्यला पास्ता खाण्यासाठी बाहेर जाऊया सांगतो. तन्वी उगाच मुद्दाम खोटी सहानुभूती अर्जुनला दाखवत फाईल मिळवण्यासाठी चावी घेऊ पाहते. अर्जुन तन्वीला जायला सांगतो, पण तन्वी तिथेच थांबल्याने अर्जुन तिला मी नसताना केबिनमध्ये मला कुणी चालत नसल्याची चांगलीच समज देतो.
शेवटी अर्जुन व चैतन्य निघून जातात पण तन्वी बाजूलाच लपलेली असते. ती पुन्हा केबिनमध्ये फाईल शोधण्याच्या उद्देशाने शिरते. ती फाईल शोधताना नेमकी गोरे बाई तिथे तिला बघतात. दुसरीकडे सायली पूर्णा आईला शिरा दिल्याने त्या आनंदी झाल्याचे डायरीत लिहिते. मालिकेच्या पुढील भागात तन्वीच्या हाती अखेर सायली व अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल लागते. आता प्रियाच सत्य अर्जुनसमोर येणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.