शनिवार, एप्रिल 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अस्तिकट्यारसाठी रुपालीकडून शेखरविरुद्ध प्रतिबिंब शक्तीचा वापर, विरोचकाला कट्यार मिळणार का?

Saurabh Moreby Saurabh More
जून 26, 2024 | 10:07 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Saatvya Mulichi Saatvi Mulgi serial update Rupali use reflection power against Shekhar to get Astikatyar

अस्तिकट्यारसाठी रुपालीकडून शेखरविरुद्ध प्रतिबिंब शक्तीचा वापर, विरोचकाला कट्यार मिळणार का?

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या कालच्या भागात रुपालीला प्रतिबिंब शक्तीचा वापर करताना बघितले होते. त्यानंतर शेखरने त्या श्लोकाचे वाचन करताच त्याच्या डोळ्यातून रक्त येऊ लागले. अशातच आजच्या भागात शेखरच्या डोळ्यातून रक्त येण्यामागे तो श्लोक असल्याची खात्री घरातील सर्वांना झाली आहे. त्यानंतर शेखर, नेत्रा व अद्वैत विरोचकाच्या पुढील हाळचालींची माहिती व्हायला हवी असा विचार करतात. पुढे रुपाली सर्पलीपीने लिहिलेलं एक श्लोक मुद्दाम तिच्या खोलीत ठेवते व  तो कागद मुद्दाम शेखरला  दिसेल असा लपवून ठेवते.

त्यांतर शेखर तो कागद घेऊन नेत्रा, अद्वैत व इंद्राणी यांना दाखवते. त्यानंतर तो मंत्र अद्वैत वाचतो. पण घरातल्यांना गाफील करण्यासाठी व त्यांचा वेळ वाया घालवण्यासाठी रुपालीने हे सगळं केलेलं असतं. पुढे शेखर, इंद्राणी, नेत्रा व अद्वैत त्या मंत्राचा विचार करु लागतात. त्या मंत्राचा नक्की काय अर्थ असेल  याचा ते विचार करु लागतात. मात्र यामागे रुपालीच असल्याचा संशय इंद्राणीला येतो. इतक्या सहजासहजी विरोचक हे करणार नाही, असा विचार ती करते.

View this post on Instagram

A post shared by सातव्या मुलीची सातवी मुलगी (@saatvyamulichisaatvimulgioffic)

पुढे रुपाली इंद्राणीविरुद्ध प्रतिबिंब शक्तीचा वापर करण्यासाठी मंत्राचे वाचन करते आणि मोठ्या पावसात व ढगांच्या गडगडाटात इंद्राणीचे प्रतिबिंब तयार होते असं वाटतं पण ते प्रतिबिंब नसतं. रुपाली इंद्राणीला अस्तिकट्यारबद्दल विचारणार इतक्यात तिथे नेत्रा येते. त्यानंतर इंद्राणी नेत्राला काहीतरी गडबड असल्याचे कळते. तसंच रुपाली माझ्याकडे अस्तिकट्यार मागत होती असं सांगते. त्यानंतर दोघी विरोचकांच्या नवीन शक्तीबद्दल विचार करत असतात.

आणखी वाचा – जय दुधाणेच्या वडिलांचे निधन, कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर, म्हणाला, “माझा सुपरहिरो गमावला”

पुढे रुपाली इंद्राणीचे प्रतिबिंब नसून मी खऱ्या इंद्राणीकडे अस्तिकट्यार मागत असल्याबद्दल स्वत:शीच संवाद साधते. त्यानंतर आता पुढे काय करायचं याचा विचार करत असताना रुपाली इंद्राणीविरुद्ध अस्तिकट्यारचा वापर न् करता आता शेखरविरुद्ध या शक्तीचा वापर करण्याचा विचार करते. पुढे इंद्राणी त्या मंत्राचे वाचन करत त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करते. तसेच आपल्याकडून एखादी चूक व्हावी हाच रुपाली विचार करत असणार असं ती म्हणते.

आणखी वाचा – मिथुन, वृषभ व कर्क राशीच्या लोकांसाठी बुधवार असणार फलदायी, नोकरीत व व्यवसायात होणार आर्थिक लाभ

त्यामुळे आता रुपालीने शेखरविरुद्ध प्रतिबिंब शक्तीचा वापर केल्यानंतर शेखर तिला अस्तिकट्यारची माहिती देणार का? की त्याआधीच राजाध्यक्ष कुटुंबीय सावध होणार हे आगामी भागांत पाहायला मिळेल.     

Tags: marathi entertainment newsMarathi Serial Newssaatvya mulichi saatvi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
anupam kher sold mumbai home
Entertainment

भाड्याने राहायला सुप्रसिद्ध अभिनेत्याने विकलं घर, २२ वर्षात आलिया भट्टने घेतल्या अभिनेत्याच्या दोन्ही मालमत्ता, किंमत…

एप्रिल 25, 2026 | 10:18 am
Nehha Pendse tv shows
Entertainment

“त्याने मला अचानक पकडलं”, मुंबईच्या भररस्त्यात अभिनेत्रीसह घडलं असं काही की…; म्हणाली, “जवळ जाऊन…”

एप्रिल 25, 2026 | 9:57 am
Next Post
Paaru Serial Update

दिशा-दामिनीचं पितळ उघडं पडणार?, प्रीतमच्याही आयुष्यात नवी मुलगी आली अन्…; साखरपुडा मोडत प्रेमाची कबुली देणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.