शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात दोन्ही सख्ख्या भावांची गैरहजेरी?, भाऊ कुशनेच  सांगितलं सत्य, म्हणाला, “उपस्थित नव्हतो असं…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 26, 2024 | 11:02 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sonakshi Sinha's brother Kush Sinha responded to rumors of his absence in his sister's wedding.

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात दोन्ही सख्ख्या भावांची गैरहजेरी?, भाऊ कुशनेच सांगितलं सत्य, म्हणाला, "उपस्थित नव्हतो असं..."

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हा सध्या तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. गेले काही दिवस सोशल मीडियावर तिच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या. तिच्या लग्नानंतरही तिच्याबद्दल अनेक चर्चा होताना दिसत आहेत. सोनाक्षी लग्नात वडील शत्रुघ्न सिन्हा व आई पूनम सिन्हा यांनी हजेरी लावली होती. पण लव व कुश हे दोघे भाऊ बहिणीच्या लग्नात सहभागी झाले नाहीत अशा अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत. लवने त्याच्या अनुपस्थितीवर प्रतिक्रिया दिली होती, परंतु आता कुशने या अफवा फेटाळून लावल्या आहेत. त्याने सांगितले की तोदेखील बहीणीच्या लग्नाला उपस्थित होता.  

सोनाक्षी सिन्हाला दोन मोठे भाऊ आहेत. लव व कुश. दोघेही जुळे आहेत. दोघेही बहिणीच्या लग्नावर नाराज असून ते बहीणीच्या लग्नात अंतर राखत असल्याचे बोलले जात होते. यावर आता कुशने ‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत आपण लग्नाला उपस्थित असल्याचं सांगितलं आहे. कौटुंबिक कलहाच्या अफवांचे खंडन करताना कुश असं म्हणाला की, “मी यापूर्वीही लोकांना चुकीची माहिती प्रकाशित करताना पाहिले आहे. याची सुरुवात एका अग्रगण्य पोर्टलवर प्रकाशित झालेल्या एका लेखाने झाली, ज्यात एका निनावी स्त्रोताचा उल्लेख आहे. आता हे सर्व कोण करत आहे आणि ही माहिती त्यांना कुठून मिळत आहे, मला माहीत नाही. पण मी लग्नात हजर होतो आणि त्याचे फोटोदेखील आहेत”.

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

आणखी वाचा – अस्तिकट्यारसाठी रुपालीकडून शेखरविरुद्ध प्रतिबिंब शक्तीचा वापर, विरोचकाला कट्यार मिळणार का?

यापुढे कुश असं म्हणाला की, “पापाराझींनी पाहुण्यांचे फोटो काढले. परंतु मला प्रसिद्धीपासून अंतर राखणे आवडते. म्हणून मी यापासून दूर होतो. मी जास्त प्रसिद्ध नाही आणि मला जास्त पाहिलेही जात नाही. पण याचा अर्थ असा नाही की, मी तिथे नव्हतो. मी तिथे उपस्थित होतो आणि माझ्या बहिणीसाठी सर्व शुभेच्छा आहेत आणि नेहमीच तिला शुभेच्छा देईन”.

आणखी वाचा – जय दुधाणेच्या वडिलांचे निधन, कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर, म्हणाला, “माझा सुपरहिरो गमावला”

दरम्यान, सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांनी २३ जून २०२४ रोजी लग्न केलं. जवळपास ७ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रजिस्टर्ड पद्धतीने लग्न झाल्यानंतर सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. शिवाय खुद्द सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी देखील सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत.

Tags: Bollywood entertainment newsKush Sinhasonakshi Sinha
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 divyanka sirohi death reason
Entertainment

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

एप्रिल 23, 2026 | 3:00 pm
veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Next Post
Prince Narula and his wife Yuvika Chaudhary announced pregnancy after 6 years of marriage.

प्रिन्स नरुला होणार बाबा, लग्नाच्या सहा वर्षांनंतर अभिनेत्याने दिली गुडन्यूज, सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.