अभिनेत्री सायली संजीव हिने मालिका, चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांमध्ये कायमच सोडली. मालिका आणि चित्रपट आणि फोटोशूटसोबत सायली एका वेगळ्याच कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. टीम इंडियाचा दमदार फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि सायली संजीव यांच्या अफेयरच्या चर्चा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यात. यावर सायलीने जरी मौन सोडत त्यांच्यात असे काही नाही असं म्हटलं असलं तरी प्रेक्षक कमेंट केल्या वाचून राहत नाहीत.(Sayali Sanjeev Ruturaj Gaikwad)
पहा ऋतुराजच्या फॅन्सची सायलीच्या फोटोवरील कमेंट (Sayali Sanjeev Ruturaj Gaikwad)
सायलीचा सोशल मीडियावरील वावरही बराच मोठा आहे. सायली सोशल मीडियावरून काही ना काही पोस्ट करत नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडते. तिचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. अशातच सायलीने सोशल मीडियावर एक येलो रंगाचा ड्रेस घालून फोटो शेअर केला आहे. दरम्यान या फोटोवरील कमेंटने साऱ्या प्रेक्षकांच्या नजरा वळविल्या आहेत.
सध्या सगळीकडेच आयपीएलचे वारे वाहू लागले आहेत. आणि अशातच काल टीम चेन्नईने बाजी मारलीय. आणि टीम चेन्नईमध्ये ऋतुराज गायकवाड प्लेयर म्हणून आहे. यावरूनच सायलीच्या फोटोवर कमेंट करत एका युजरने म्हटलंय, वहिनी काल match जिंकलो म्हणून yellow dress का?????? तर दुसऱ्या एका युजरने सायली ऋतुराज गायकवाड वहिनी साहेब अशी कमेंट केलीय.

सायलीने घातलेल्या पिवळ्या रंगाच्या कुर्त्यावरून ही चर्चा रंगलेली दिसतेय. ऋतुराज हा चेन्नई टीम मधून खेळतोय. ऋतुराज आणि सायली यांच्यात अफेयर असल्याचं बरेच दिवसापासून कानावर येतंय. मात्र त्यांच्यात असं काही नसल्याचं बरेचदा सायली संजीवने म्हटलंय. एका मुलाखतीत यावर स्पष्ट मतदेखील तिने मांडले होते. या अफवांमुळे आमच्या मैत्रीच्या नात्यातही दुरावा आल्याचे तीने म्हटलं होत. (Sayali Sanjeev Ruturaj Gaikwad)
सायलीने स्पष्ट करत म्हटलं की, ‘आमच्या नात्याबद्दल जेव्हा चर्चा रंगू लागल्या तेव्हा त्याचा परिणाम आमच्या मैत्रीवर झाला. आता मैत्रीच्या नात्यातही दुरावा निर्माण झाला आहे. आता आम्ही मित्रासारखं बोलूही शकत नाही. माझं नाव त्याच्यासोबत जोडलं जातंय याचा अंदाज ही मला नव्हता.
