शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बहूचर्चित ‘द फॅमिली मॅन’ सीरिजच्या आगामी सीझनच्या शूटिंगला सुरुवात, लवकरच प्रदर्शित होणार तिसरा सीझन, जाणून घ्या…

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 19, 2024 | 1:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
The Family Man third season will be released soon see the details

बहूचर्चित ‘द फॅमिली मॅन’ सीरिजच्या आगामी सीझनच्या शूटिंगला सुरुवात, लवकरच प्रदर्शित होणार तिसरा सीझन, जाणून घ्या...

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओची ओरिजिनल वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’ने प्रेक्षकांच्या मनात अशी एक वेगळीच छाप निर्माण केली आहे. या सिरीजचे आतापर्यंत दोन सीझन्स प्रेक्षकांच्या भेटीला आले असून तिसरा सीझनही लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या सीरिजचे अनेक प्रेक्षक या तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सीरिजचा पहिला सीझन २०१९मध्ये आला होता. त्यानंतर २०२१ मध्ये निर्मात्यांनी या सीरिजचा दुसरा सीझन आणला होता.

अशातच आता गेल्या तीन वर्षांपासून सर्वजण ‘द फॅमिली मॅन ३’ची वाट पाहत आहेत. तुम्हीही या सिरीजचे चाहते असाल आणि तुम्हीही ‘द फॅमिली मॅन ३’ची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी अपडेट आहे. ‘द फॅमिली मॅन ३’च्या शूटिंगला येत्या वर्षभरात सूरवात होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. ‘मिड डे’शी झालेल्या संवादात ‘द फॅमिली मॅन’च्या पहिल्या भागाचे लेखक सुपरण यांच्याकडून ही माहिती समोर येत आहे. ‘मिड डे’शी झालेल्या संवादात त्यांनी राज व डिके हे याबद्दल बोलण्यासाठी योग्य व्यक्ती असून यावर्षी सीरिजच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचे म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Manoj Bajpayee (@bajpayee.manoj)

आणखी वाचा – नेत्राने वध करुनही पुन्हा विरोचकाने अस्तिका म्हटल्यावर दिसला नाग, रुपालीला दक्षिण दिशेला बोलावणं, देवी आईच्या लेकी पुढे काय करणार?

तर ‘पत्रिका’च्या वृत्तानुसार, या सीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. मनोज वाजपेयीने सांगितले की, ‘द फॅमिली मॅन ३’ ॲमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. त्याचे शूटिंग सुरू झाले आहे. तसेच यावेळी त्याची व्यक्तिरेखा अधिक मनोरंजक असेल. या सीझन मध्ये त्याच्या पत्नीची प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे शूटिंगनंतर पोस्ट प्रॉडक्शनचे काम केले जाईल आणि या सगळ्याला खूप वेळ लागेल. म्हणून ‘द फॅमिली मॅन-३’चा तिसरा आगामी सीझन पुढच्या वर्षी म्हणजेच २०२५ च्या सुरुवातीला प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा – नीना गुप्ता होणार आजी, वयाच्या ३४ व्या वर्षी लेक मसाबा गरोदर, अभिनेत्री म्हणाली, “मुलांचे मूल…”

या सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये मनोज यांनी दहशतवाद्यांशी लढा दिला होता. त्यांतर दुसऱ्या सीझनमध्ये अभिनेत्री समंथा रुथ प्रभू एका दहशतवाद्याच्या भूमिकेत होती. या सीरिजचे दोन्ही सीझन हिट ठरले आणि तेव्हापासून लोक तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे आता तिसऱ्या सीझनमध्ये काय पाहायला मिळणार याचीउत्सुकता लागून राहिली  आहे.

Tags: ott entertainment newsott newsThe Family Man Season 3
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Kshitee Jog answers to trollers

"मंगळसूत्र न घातल्याने असं काय होणार आहे?", मंगळसूत्र न घालण्यावरुन क्षिती जोगला सुनावल्यानंतर स्पष्ट उत्तर, म्हणाली, "खूप वायफळ वेळ…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.