अॅमेझॉन प्राईम व्हिडीओची ओरिजिनल वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’ने प्रेक्षकांच्या मनात अशी एक वेगळीच छाप निर्माण केली आहे. या सिरीजचे आतापर्यंत दोन सीझन्स प्रेक्षकांच्या भेटीला आले असून तिसरा सीझनही लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या सीरिजचे अनेक प्रेक्षक या तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सीरिजचा पहिला सीझन २०१९मध्ये आला होता. त्यानंतर २०२१ मध्ये निर्मात्यांनी या सीरिजचा दुसरा सीझन आणला होता.
अशातच आता गेल्या तीन वर्षांपासून सर्वजण ‘द फॅमिली मॅन ३’ची वाट पाहत आहेत. तुम्हीही या सिरीजचे चाहते असाल आणि तुम्हीही ‘द फॅमिली मॅन ३’ची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी अपडेट आहे. ‘द फॅमिली मॅन ३’च्या शूटिंगला येत्या वर्षभरात सूरवात होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. ‘मिड डे’शी झालेल्या संवादात ‘द फॅमिली मॅन’च्या पहिल्या भागाचे लेखक सुपरण यांच्याकडून ही माहिती समोर येत आहे. ‘मिड डे’शी झालेल्या संवादात त्यांनी राज व डिके हे याबद्दल बोलण्यासाठी योग्य व्यक्ती असून यावर्षी सीरिजच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचे म्हटले आहे.
तर ‘पत्रिका’च्या वृत्तानुसार, या सीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. मनोज वाजपेयीने सांगितले की, ‘द फॅमिली मॅन ३’ ॲमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. त्याचे शूटिंग सुरू झाले आहे. तसेच यावेळी त्याची व्यक्तिरेखा अधिक मनोरंजक असेल. या सीझन मध्ये त्याच्या पत्नीची प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे शूटिंगनंतर पोस्ट प्रॉडक्शनचे काम केले जाईल आणि या सगळ्याला खूप वेळ लागेल. म्हणून ‘द फॅमिली मॅन-३’चा तिसरा आगामी सीझन पुढच्या वर्षी म्हणजेच २०२५ च्या सुरुवातीला प्रदर्शित होणार आहे.
आणखी वाचा – नीना गुप्ता होणार आजी, वयाच्या ३४ व्या वर्षी लेक मसाबा गरोदर, अभिनेत्री म्हणाली, “मुलांचे मूल…”
या सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये मनोज यांनी दहशतवाद्यांशी लढा दिला होता. त्यांतर दुसऱ्या सीझनमध्ये अभिनेत्री समंथा रुथ प्रभू एका दहशतवाद्याच्या भूमिकेत होती. या सीरिजचे दोन्ही सीझन हिट ठरले आणि तेव्हापासून लोक तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे आता तिसऱ्या सीझनमध्ये काय पाहायला मिळणार याचीउत्सुकता लागून राहिली आहे.