रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“टीव्ही मागची दुनिया कशी ते आम्हालाच माहित”, मालिकेत काम करण्यावरुन असं का बोलला राकेश बापट?, म्हणाला, “तिथलं वातावरण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 17, 2024 | 2:01 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
navri mile hitler la fame raqesh bapat

"टीव्ही मागची दुनिया कशी ते आम्हालाच माहित", मालिकेत काम करण्यावरुन असं का बोलला राकेश बापट?, म्हणाला, "तिथलं वातावरण…"

सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातील एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘नवरी मिळे हिटलरला’. या मालिकेला कमी कालावधीत अधिक पसंती मिळाली आहे. या मालिकेमध्ये हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता राकेश बापट पहिल्यांदाच मराठीमालिकेमध्ये काम करताना पाहायला मिळत आहे. या मालिकेमध्ये राकेशने अभिराम जहागीरदार ही भूमिका साकारली असून त्याच्याबरोबर वल्लरी विराज ही अभिनेत्री ‘लीला’च्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. या मालिकेमध्ये राकेशची भूमिका हटके असल्याने प्रेक्षक त्याच्या भूमिकेला पसंती देत आहेत. त्याची भूमिका व मराठी मालिकेतील प्रवासाबद्दल तो व्यक्त झाला आहे. (navri mile hitler la fame raqesh bapat)

राकेशने पहिल्यांदाच मराठी मालिकेमध्ये काम केले आहे. त्याच्या मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रवासाबद्दल भाष्य केले आहे. नुकतीच त्याने ‘इट्स मज्जा’ ला मुलाखत दिली त्यामध्ये त्याने आपल्या प्रवासाबद्दल माहिती दिली आहे. त्याने मालिकेच्या सेटवरील वातावरणाबद्दलही सांगितले आहे. तो म्हणाला की, “एखादा सीन शूट करताना आमच्याकडून तयारी करुन घेतली जाते. इथे प्रत्येकजण खूप सपोर्टिव्ह आहे. या मालिकेचा सेट हा खूप अलिशान आहे. हा पूर्ण सेट खूप सुंदररित्या बांधण्यात आला आहे”.

आणखी वाचा – नम्रता संभेराव-मुक्ता बर्वेची जुगलबंदी, मायराची झलक, कामवाली बाई अन्…; ‘नाच गं घुमा’चा धमाकेदार ट्रेलर, प्रेक्षकांची भरभरुन पसंती

पुढे त्याने कलाकारांच्या मेहनतीवर देखील भाष्य केले आहे. तो म्हणाला की, “आम्ही मालिकेमध्ये सजतो, नटतो. आम्ही सर्वजण खूप छान दिसतो. मात्र सीन चित्रित करताना येणाऱ्या समस्या खूप असतात. सगळ्यांना वाटते की टीव्हीवरची दुनिया छान असते. मात्र ही दुनिया नक्की कशी आहे हे आम्हालाच माहीत आहे. आम्ही सेटवर एकदम आरामात राहत असू सगळ्यांना वाटते मात्र असे नसून आम्हाला आजूबाजूच्या वातावरणाचाही सामना करावा लागतो. सध्या ऊन खूप जास्त आहे आणि त्यामुळे आम्हालाही या उन्हाचा खूप त्रास सहन करावा लागतो”.

आणखी वाचा – Video : दुबईमध्ये पावसाचं थैमान, पूरामध्ये अडकला गायक राहुल वैद्य, हातात शूज घेऊन पाण्यामधून चालत बाहेर पडला अन्…; व्हिडीओ व्हायरल

यानंतर त्याने सांगितले की, “ही मालिका करताना मला खूपच मजा येत आहे. प्रेक्षकांना खूप आवडत आहे. मला माझ्या कुटुंबियांचे तसेच माझ्या मित्रांचे खूप फोन व मेसेज येतात. मी पुण्यात जिथे राहतो तिथे माझी मालिका सर्वजण पाहतात. संपूर्ण बिल्डिंगमध्ये एका वेळेला एक टायटल सॉंग वाजते. ही माझ्या कामाची पोचपावतीच आहे”.

दरम्यान राकेशने या मालिकेतील इतर कलाकारांचेही खूप कौतुक केले आहे. सध्या ही मालिका एका रंजक वळणावर असून लीला व अभिरामचा साखरपुडा होणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. मात्र पुढे नक्की काय होणार हे आता पाहाण्यासारखे आहे.

Tags: marathi actormarathi serial raqesh bapatnavri mile hitler la
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
ayodhya rammandir surya tilak

Video : सजली रामनगरी! अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला सूर्यतिलक, भक्तीमय वातावरणामध्ये दंग झाले भाविक, दर्शनासाठी तुफान गर्दी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.