शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

राजकारणात प्रवेश केल्यानंतर ‘रामायण’ फेम अरुण गोविल अभिनयक्षेत्र सोडणार, म्हणाले, “जनतेची सेवा करणं…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 13, 2024 | 11:30 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
arun govil on acting

राजकारणात प्रवेश केल्यानंतर ‘रामायण’ फेम अरुण गोविल अभिनयक्षेत्र सोडणार, म्हणाले, "जनतेची सेवा करणं..."

टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध मालिका ‘रामायण’ या मालिकेमध्ये रामाची भूमिका केलेले अभिनेते अरुण गोविल हे सध्या खूप चर्चेत आहेत. त्यांनी नुकताच राजकारणात प्रवेश केला आहे. भारतीय जनता पक्षाकडून त्यांना तिकीट मिळाले असून ते आता उमेदरवारी लढवणार आहेत. मात्र आता त्यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर अभिनयापासून दूर जाणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यावर त्यांनी अद्याप स्पष्ट उत्तर नाही. पण त्यांनी अभिनय सोडला तर ते संपूर्ण वेळ राजकारणासाठी देतील असा अंदाज बांधला जात आहे. (arun govil on acting)

उत्तर प्रदेशमधील मेरठ येथून ते आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. सध्या ते प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात व्यस्त आहेत. त्यांनी नुकताच ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली. ते मुलाखतीमध्ये म्हणाले की, “अभिनयापासून वेगळे झाल्यानंतर ही माझ्या करिअरची दुसरी पायरी आहे. मी याबद्दल खूप उत्सुक आहे. यामध्ये नक्की कोणते वळण येईल हे मात्र मलाही जाणून घ्यायचे आहे”.

आणखी वाचा- “दोघेही भयानक दिसता”, लूकवरुन रोहित राऊत व त्याच्या बायकोला नेटकऱ्यांनी हिणवलं, उत्तर देत म्हणाली, “अजून झूम करुन…”

View this post on Instagram

A post shared by Arun Govil (@siyaramkijai)

ते पुढे म्हणाले की, “आतापर्यंत झालेले सर्व बदल मी स्वीकारले आहेत. हे जे होत आहे ते खूप चांगले आहे. मी शहरामध्ये तसेच आजूबाजूला प्रचार करण्यास व्यस्त आहे. तसेच पक्षाचे इतर कार्यकर्ते इतर गोष्टींची काळजी घेत आहेत”.

आणखी वाचा – नेत्राच्या हातून विरोचकाचाही अंत, देवी आईचा संकेत की अजून काही, मालिकेत पुढे काय घडणार?

तसेच त्यांनी  सांगितले की, “राजकारणात येण्याचा निर्णय मी अचानक घेतला. मला याआधी उमेदवारीचे तिकीट मिळत होते. पण राजकारणात येण्याचा माझा कोणताही मानस नव्हता त्यामुळे मी स्वीकारले नव्हते. यावेळी मात्र माझी स्वतःची इच्छा झाली आणि मी उमेदवारी स्वीकारली”. पुढे ते म्हणाले की, “राजकरणांमध्ये येऊन जनतेची सेवा करणे हे एकमात्र ध्येय आहे. पण हे मी रामयणाप्रमाणे आध्यात्मिक व सांस्कृतिक स्वरूपात करत आहे. हे मला करायला मिळत आहे हे माझं भाग्य आहे”.

तसेच त्यांना अभिनय सोडण्यावरुनदेखील प्रश्न विचारले गेले. त्यावर ते म्हणाले की, “हे माझ्यासाठी आता ठरवणे कठीण आहे. याबद्दल मी अजून कोणताही विचार केला नाही तसेच काही ठरवलेही नाही. मी माझे सर्व काम पूर्ण करेन. तसेचकाही प्रोजेक्ट लाइनअप आहेत जे मला पूर्ण करायचे आहेत. ते पूर्ण केल्यानंतर मी निर्णय घेईन”.

आणखी वाचा – पारूच्या जीवाला होणाऱ्या नवऱ्यापासून धोका, दिशा व दामिनीचा डाव होणार का सफल?, मालिकेत नवा ट्विस्ट

तसकह काही दिवसांपूर्वी नितीश तिवारी यांच्या ‘रामायण’ या चित्रपटांमध्ये अरुण दशरथाची भूमिका करतानाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. पण त्याबद्दल ते म्हणाले की, “जे फोटो व्हायरल होत आहेत ते मी पाहिले नाहीत. पण नितीशबरोबर काम करताना मला मजा आली. सध्या मी याबद्दल अजून काही सांगू शकणार नाही. सध्या थोडेच चित्रकरण झाले असून काही चित्रीकरण होणे बाकी आहे”.

Tags: Arun Govilpoliticsramayanramayan serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Prathamesh Parab Wife

प्रथमेश परबच्या बायकोचे सासूबाईंकडून लाड, ऑफिसमधून सून घरी येताच बनवला खास पदार्थ, म्हणाली, "घरी आल्या आल्या…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.