सोशल मीडियावर गायिका जुईली जोगळेकर व गायक रोहित राऊत नेहमीच चर्चेत असतात. रोहितने ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’पासून विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. आपल्या गायनसेवेने त्याने श्रोत्यांची मनं जिंकली. अशाच एका कार्यक्रमामध्ये त्याची जुईली जोगळेकरशी भेट झाली. त्यानंतर जुईली व रोहित यांनी विवाहसोहळा उरकला. जुईलीने देखील आजवर तिच्या गायनसेवेने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. जुईली आणि रोहित सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. (Juilee Jogalekar and rohit raut troll)
सोशल मीडियावरुन ही जोडी नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. बरेचदा जुईली व रोहित त्यांचे एकत्र फोटो शेअर करताना दिसतात. अशातच जुईलीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन गुढीपाडव्यानिमित्त दोघांचा एक खास फोटो शेअर केला आहे. रोहित व जुईली यांचा या फोटोमध्ये पारंपरिक अंदाज पाहायला मिळत आहे.
जुईलीने हा पारंपरिक फोटो शेअर करत या फोटोखाली कॅप्शन देत असं म्हटलं की, “जुईली-रोहितचा पाडवा अपडेट. गुढी उभारणं, पुरणपोळी फस्त करणं, दुपारची झोप घेणं, तयार होऊन एक गोड सेल्फी काढणं आणि तो सेल्फी वेळेत पोस्ट करणं. तुम्हा सर्वांना आमच्याकडून शुभ पाडवा”. जुईली व रोहित या फोटोमध्ये खूप आनंदी असलेले पाहायला मिळाले. दोघंही त्यांच्या या फोटोत हसत सेल्फी घेताना दिसले. मात्र या फोटोवरुन नेटकऱ्यांनी जुईली व रोहितला ट्रोलही केलं.
जुईली व रोहित यांना ट्रोल करत नेटकरी म्हणाला की, “हे दोघं एवढे काय खास दिसत नाही आणि फोटो पण एकदम भयानक आहे”. यावर कमेंट करत जुईली म्हणाली, “आणि एवढा असूनही फोटो बघून प्रतिक्रिया करायचीच आहे काकूंना”, असं म्हटलं. तर आणखी एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं की, “फोटो झूम करुन हिचे दात आणि हिरड्या पाहा”. यावर जुईलीने चोख उत्तर देत म्हटलं की, “मस्त आहे ना? अजून झूम करून बघा नसा देखील दिसतील. काकू. माझे दात, माझ्या हिरड्या. मी बघेन काय करायचं ते. हो की नाही? तुम्ही झूम करा. बघत बसा”.