बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नेत्राच्या हातून विरोचकाचाही अंत, देवी आईचा संकेत की अजून काही, मालिकेत पुढे काय घडणार?

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 13, 2024 | 11:01 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi serial new promo Netra is killing Virochka

नेत्राच्या हातून विरोचकाचाही अंत, देवी आईचा संकेत की अजून काही, मालिकेत पुढे काय घडणार?

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. या मालिकेतील अनेक नवनवीन ट्विस्ट्स या मालिकेविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे. या मालिकेचे कथानक त्रिनयना व विरोचक यांच्यातील युद्धावर आधारित आहे. मालिकेतील अनेक ट्विस्टमुळे व खिळवून ठेवणाऱ्या कथानकामुळे ही मालिका बघण्याचा प्रेक्षकांचा कल वाढत आहे.

अशातच या मालिकेत नेत्रानेअस्तिकाचा खून केल्याचा नवीन ट्विस्ट पाहायला मिळाला. अद्वैतचे लक्ष नसताना अस्तिका एका धारदार शस्त्राने अद्वैतचा जीव घेण्याचा प्रयत्न करते. मात्र, इतक्यात नेत्रा येते व त्याचा जीव वाचवते आणि या प्रयत्नांत नेत्राच्या हातून अस्तिकाचा अंत होत असल्याचा प्रोमो नुकताच पाहायला मिळाला. यानंतर आता यात आणखी एक नवीन ट्विस्ट आला आहे तो म्हणजे नेत्रा विरोचकाचाही वध करते.

View this post on Instagram

A post shared by सातव्या मुलीची सातवी मुलगी (@saatvyamulichisaatvimulgioffic)

आणखी वाचा – पारूच्या जीवाला होणाऱ्या नवऱ्यापासून धोका, दिशा व दामिनीचा डाव होणार का सफल?, मालिकेत नवा ट्विस्ट

नुकताच या ट्विस्टबद्दल उत्सुकता निर्माण करणारा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये विरोचक नेत्रासमोर अद्वैतला जीवे मारण्याची धमकी देते. उभाच्या उभा चिरून काढणार आहे याला असं म्हणत ती त्याचा गळा धरते आणि त्याचं जीव घेण्याचा प्रयत्न करते. यावर तिला सोडण्यासाठी घरातली सगळे मंडळी धावून येतात. मात्र विरोचकाला कुणीही सोडवू शकत नाही. विरोचकाने अद्वैतचा गळा पकडल्यामुळे त्याचा जीव अस्वस्थ होतो.

आणखी वाचा – “लग्नाआधी माझं एक अफेअर होतं आणि…”, ‘चला हवा येऊ द्या’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “आंतरजातीय विवाहामुळे…”

अद्वैतला अस्वस्थ झालेला पाहून नेत्राला राहवत नाही आणि ती विरोचकाच्या गळ्यावरून चाकू फिरवत तिचा वध करत. त्यानंतर विरोचक जमिनीवर कोसळल्याचे यामध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता विरोचकाचा खरंच अंत झाला आहे का? तिच्या जाण्यामुळे आता मालिकेत आणखी नवीन ट्विस्ट काय येणार? यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. त्याचबरोबर विरोचकाचा अंत झाल्यामुळे आता नेत्रा-अद्वैतवर तसेच मालिकेच्या कथानकावरही काय परिणाम होणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.       

Tags: marathi serialSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Juilee Jogalekar and rohit raut troll

"दोघेही भयानक दिसता", लूकवरुन रोहित राऊत व त्याच्या बायकोला नेटकऱ्यांनी हिणवलं, उत्तर देत म्हणाली, "अजून झूम करुन…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.