रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्यासाठी हा विषय…”, घटस्फोटानंतर शेफाली शाहच्या पूर्वाश्रमीच्या पतीचं उघडपणे भाष्य, म्हणाले, “आम्ही एकमेकांच्या समोर आलो तरीही…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 28, 2024 | 12:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
harsh chhaya on shefali shah

“माझ्यासाठी हा विषय…”, घटस्फोटानंतर शेफाली शाहच्या पूर्वाश्रमीच्या पतीचं उघडपणे भाष्य, म्हणाले, “आम्ही एकमेकांच्या समोर आलो तरीही…”

बॉलिवूडमधील कमालीची अभिनेत्री म्हणून शेफाली शहाचे नाव आवर्जून घेतलं जातं. १९९५ साली त्यांनी ‘ ‘रंगीला’ या चित्रपटातून अभिनय विश्वामध्ये पदार्पण केले. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. मनोरंजन क्षेत्रांमध्ये अभिनयाच्या जोरावर स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मात्र तिने अनेक चढ उतार पाहिले आहेत.शेफाली शाह सध्या चित्रपट निर्माते विपुल शाह यांच्याबरोबर सुखाने आपले आयुष्य जगत आहे. त्यांना दोन मुलंही आहेत. पण विपुल हे त्यांचे दुसरे पती असून तिने पहिले लग्न टेलिव्हीजन व चित्रपट अभिनेते हर्ष छाया यांच्याबरोबर झाले होते. याबद्दल नुकतेच हर्ष यांनी शेफालीच्या नात्याबद्दल मन मोकळे केले आहे. त्यांच्यासाठी आता शेफालीचा विषय बंद झाल्याचेही सांगितले आहे. तसेच शेफाली यांनीही घटस्फोटावेळी परिस्थिति वाईट असल्याचेही सांगितले होते. (harsh chhaya on shefali shah)

शेफाली व हर्षने १९९४ मध्ये लग्न केले. पण सहा वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला. दोघांनीही ‘हसरते’ या मालिकेमध्ये एकत्रित काम केले होते. या मालिकेदरम्यान त्या दोघांमध्ये मैत्री झाली नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पण दोघांच्या नात्याचा शेवट खूप वाईट झाला असेही समजले.

आणखी वाचा- Video : रवी जाधव यांच्या कोकणातल्या गावी शिमग्याला अशी नाचवतात पालखी, अंगणातील व्हिडीओ केला शेअर, म्हणाले, “गावची पालखी…”

View this post on Instagram

A post shared by Kommune (@kommuneity)

दोघांच्या घटस्फोटाबद्दल हर्षने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हंटले आहे की, “ ही गोष्ट खूप जुनी आहे. २० ते २५ वर्ष उलटून गेली आहेत. माझ्यासाठी हा विषय बंद झाला आहे. आम्ही अजिबात बोलत नाही. मला त्यांच्याशी बोलण्यात काही संशया नाही. पण आम्ही जेव्हा एकमेकांसमोर येऊ तेव्हा मात्र मी अवघडून जाईन”.

आणखी वाचा – घर अरुंधतीच्या नावावर होण्याची संजनाला भीती, आशुतोषच्या मृत्यूनंतर ‘आई कुठे…’मध्ये पुढे काय घडणार?, प्रेक्षक म्हणाले, “संजनाला आता…”

पुढे ते म्हणाले की, “आमचा अचानक घटस्फोट झाला नाही. काही महिन्यांपासून आमच्यामध्ये वाद सुरु झाले होते. त्यावेळी खूप वाईट वाटले होते. आम्ही वेगळे झाल्यानंतर मला आश्चर्य वाटले नाही. आठ महिन्यांपासून आमच्यामध्ये ही परिस्थिति निर्माण झाली होती. आता मी या सर्व प्रकाराकडे व्यावहारीक स्वरूपात पाहतो. दोन व्यक्ती भेटल्या, प्रेम झाले, लग्न झाले आणि वेगळे झालो. यामध्ये कोणीही काहीही करु शकत नाही. त्यामुळे असे वाटते की असे नाते निभावण्यापेक्षा वेगळे झालेले बरे”.

याबाबत एकदा शेफाली यांनी दिलेल्या मुळखतीमध्येदेखील म्हंटले होते की, “त्या नात्यासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य समर्पित केले. मी खूप मेहनत घेतली. जोपर्यंत सर्व ठीक आहे तोपर्यंतच नातं व्यवस्थित आहे हे समजावं. प्रत्येक गोष्ट आपल्या पद्धतीने होईलच असे नाही”.

शेफाली नुकतीच ‘थ्री ऑफ अस’ या सिरिजमध्ये दिसून आली होती. यामधील तिच्या भूमिकेचे खूप कौतुकही करण्यात आले होते.

Tags: divorceharsh chhayashefali shah
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Kiran Mane shared video of Mumbai’s womens speaking against pm narendra modi

Video : "मोदींची काय पूजा करु?", मराठी बायकांचा नरेंद्र मोदींवर राग, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.