बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्या भारत दौऱ्यामुळे खूप चर्चेत आली आहे. नुकतेच तिने आयोध्या येथे मुलगी मालती व पती निक जोनासबरोबर आयोध्या येथे रामलल्लाचे दर्शन घेतले होते.आता तीचे पुन्हा एकदा तिच्या कुटुंबाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका होळी पार्टीमध्ये ती आपला मित्र परिवार व कुटुंबासहित मजा मस्ती करताना दिसली. या फोटोवरुन अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. (priyanka chopra holi celebration)
प्रियांकाने होळीनिमित्त जंगी पार्टीचं नियोजन केलं होतं. या पार्टीमध्ये तीचे कुटुंबीय व मित्रमंडळी उपस्थित राहिलेली दिसली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये प्रियांकाची चुलत बहीण मन्नारा चोप्रादेखील दिसून येत आहे. यामध्ये प्रियाकाने पांढऱ्या रंगाचा चुडीदार ड्रेस घातला असून मालतीला उचलून घेतलं आहे. निकनेदेखील पांढऱ्या रंगाचा कुर्ता व पायजमा घातला आहे.
दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये प्रियांका ढोलवर नाचताना दिसत असून निक बाजूला उभा आहे. ती निकला देखील डान्स करायला सांगत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “चोप्रा परिवारसह हॅप्पी होळी!”
आणखी वाचा – “राजकारण हे पैसे कमावण्याचे…” लोकसभा निवडणुकांसाठी तिकीट मिळाल्यानंतर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली, “माझ्याकडे जे काही आहे ते…”
काही दिवसांपूर्वी तिने आयोध्या येथील राममंदिरात दर्शनात हजेरी लावली होती. यावेळी तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. तेव्हा ती एअरपोर्टवरुन मालतीला घेऊन जाताना दिसली. तिने ऊन व वाऱ्यापासून बचाव व्हावा यासाठी तिला पदराने झाकले आहे. तसेच मालतीला ती आयोध्या बोलायला शिकवत आहे. मालतीदेखील अनुकरण करत आहे. मंदिरात गेल्यानंतर कुटुंबासहित दर्शन घेताना सर्वजण कपाळाला टीका लावतात.
अमेरिकन गायक निक जोनासबरोबर लग्न झाल्यानंतर प्रियांका परदेशात स्थायिक झाली. काही कार्यक्रमानिमित्त ती भारतात येत असते. काही दिवसांपूर्वी आधी प्रियाका भारतात आली त्यानंतर दोन दिवसांनी निक देखील भारतात दाखल झाला. त्यानंतर ‘बुलगारी’ या ब्रॅंडच्या शोरूमच्या उद्घाटनासाठी उपस्थित होती.