क्रिकेटविश्वामध्ये महेंद्रसिंग धोनीचे नाव आवर्जून घेतले जाते. तो केवळ क्रिकेटच्या मैदानात नाही तर मनोरंजक्षेत्रामध्येही आपली छाप सोडतो. २००४ साली त्याने क्रिकेटविश्वात पदार्पण केले. त्यांतर आपल्या फटकेबाजीने सर्वच त्याचे चाहते झाले. त्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही. क्रिकेट खेळता खेळता त्याला जाहिरातींमध्ये काम करण्याची संधीही मिळाली. तो आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांबरोबर जाहिरातींबरोबर दिसून आला आहे. आता तो ‘ॲनिमल’ या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेला बॉबी देओलबरोबर एका जाहिरातीमध्ये दिसून येणार आहे. पण याआधी दोघांच्या बोलण्याचा एक स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. (mahedrasingh dhoni on bobby deol)
बॉबीने याबद्दलकहा एक फोटो ‘X’ वर शेअर केला आहे. या फोटोमध्ये व्हॉट्सअप नोटिफिकेशनचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. हा नंबर त्याने ‘धोनी भाई’ या नावाने शेअर केला आहे. यामध्ये लिहिले आहे की, “बॉबी तो व्हिडीओ डिलिट कर यार…तो व्हिडीओ खूपच लाजिरवाणा आहे”.
Theek hai mahi bhai kardunga delete 😈👀#Thala #ThalaForAReason #Mahi #leak #dhoni #leakkardukya #ad pic.twitter.com/oKxrmQP26Y
— Bobby Deol (@thedeol) March 20, 2024
हा स्क्रीनशॉट शेअर करत बॉबीने लिहिले आहे की, “ठीक आहे भावा. मी तो व्हिडीओ डिलिट करेन”. तसेच त्यावर एक इमोजीदेखील लावला आहे. #Thala #ThalaForAReason #Mahi #leak #dhoni #leakkardukya #ad अशा काही हॅशटॅगचाही वापर केला आहे. ज्यामुळे चाहत्यांना काही कल्पनाही आली.
बॉबीने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “माही भाईचा नंबर लीक करा बॉबी भाई”, दुसरा नेटकरी लिहितो, “हे काय चाललंय?’, तर काहींनी व्हिडीओ लीक करण्याची मागणी केली आहे.
बॉबीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो ‘ॲनिमल’ या चित्रपटामध्ये केलेली नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली. कमी वेळाच्या भूमिकेसाठी त्याला एकही संवाद मिळाला नव्हता. पण तरीही एक शब्दही न बोलता त्याने आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. त्याचप्रमाणे तो ‘आश्रम’ या वेबसिरीजमध्येही दिसून आला होता. या वेबसिरीजमध्ये त्याने साकारलेल्या भूमिकेचेही खूप कौतुक करण्यात आले होते. पण आता तो आणि महेंद्रसिंह धोनी काय जादू करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.