मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आयुष्यच संपतं जेव्हा…”, मुल झाल्यानंतर स्त्रिया शहीद होत असल्याचं सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं विधान, म्हणाली, “हे ओझं…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 20, 2024 | 6:46 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Priya Malik Instagram post

"आयुष्यच संपतं जेव्हा…", मुल झाल्यानंतर स्त्रिया शहीद होत असल्याचं सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं विधान, म्हणाली, "हे ओझं…"

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध रिॲलिटी शो ‘बिग बॉस’च्या आठव्या सीजनमध्ये दिसलेली अभिनेत्री प्रिया  मलिक सध्या आपल्या प्रेग्नन्सी फेजमध्ये आहे. प्रियाने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांबरोबर सर्व शेअर करत असते. २०२२ साली तिने करण बक्षीबरोबर लग्न केले. लग्नाच्या दोन वर्षानंतर पहिल्या बाळाच्या आगमानची तयारी करत आहेत. प्रियाने आपल्या गरोदरपणातील सर्व अनुभव शेअर करत असते. पण नुकतीच तिने एक अशी पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे ती जास्तच चर्चेत आली आहे. (Priya Malik Instagram post)

प्रियाने एक पोस्ट इन्स्टाग्रामला शेअर केली आहे यावरुन तिच्या चाहत्यांनी अनेक अंदाज बांधले आहेत. तिने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये तिने आपले दु:ख सांगितले आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये महिलांना मुलांना जन्म दिल्यानंतर आयुष्य संपल्यासारखे वाटते. तसेच तिने पिढ्यांकडून पिढ्यांकडे कशा पुढे जातात आणि त्यामुळे मुलींना कसा त्रास सहन करावा लागतो यावरही तिने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – समीर वानखेडेंचा राखी सावंतविरोधात मानहानीचा दावा, अभिनेत्रीच्या ‘त्या’ विधानानंतर प्रकरण वाढलं, म्हणालेली, “गिधाड बनून मुलांवर हल्ला…”

View this post on Instagram

A post shared by Priya Malik ???? प्रिया मलिक (@priyasometimes)

तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “इथे आपण आपले अस्तित्त्व शोधत असतो. मुलांसाठी किती मोठं ओझं असेल जेव्हा त्यांना समजत असेल की त्यांच्या आईने त्यांच्यामुळे जीवन जगणे सोडले. तसेच आपल्या मुलींच्या मनावरही एक मोठे ओझं असते जेव्हा त्यांना आई व्हायचं असतं आणि आपले नशीब निवडायचं असतं. कारण आपणच त्यांना शिकवतो की प्रेमात आहुती देणं हेच जीवनाचं सत्य आहे”.

आणखी वाचा – नितेश तिवारींच्या ‘रामायण’मध्ये ‘हा’ सुप्रसिद्ध अभिनेता साकारणार लक्ष्मणची भूमिका, तर रणबीर कपूर मोठ्या पडद्यावर साकारणार राम

पुढे तिने लिहिले आहे की, “कधीपर्यंत हे आपण आपल्या मुलींना शिकवत राहणार आहोत? कधी महिलांना जगण्यासाठी स्वातंत्र्य मिळणार आहे? आणि कधीपर्यंत ही मरणाची शिक्षा आपल्या मुलींना देणार आहोत? लग्नाच्या वेळी, प्रसूती गृहामध्ये? कोणाच्या प्रसूतीवेळी? आपल्या मुलाचा की आपल्या नवीन जन्माचा? जेव्हा आपण या सगळ्याला प्रेम म्हणतो तेव्हा आपण आपल्या मुलांना शिकवतो की जेव्हा प्रेम सुरू होते तेव्हा आयुष्य संपते”.

असे लिहीत तिने आपल्या भावना सर्वांसमोर व्यक्त केल्या आहेत. तिच्या या पोस्टमुळे चाहत्यांनीही तिची बाजू घेत तिच्या मताला सहमती दर्शवली आहे. तसेच अनेकांनी तिच्या येणाऱ्या बाळासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

Tags: actress priya malikpregnancy phasepregnantPriya Malik
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
mahedrasingh dhoni on bobby deol

महेंद्रसिंग धोनीची बॉबी देओलला त्याचा ‘तो’ व्हिडीओ डिलिट करण्याची विनंती, अभिनेता म्हणाला, “डिलिट करेन पण…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.