शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रियांका, परिणीतीनंतर चोप्रा घराण्यातील ‘ही’ अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, दिल्लीच्या केजरीवाल कुटुंबाची झाली सून

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 13, 2024 | 9:38 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Meera Chopra is got married with Rakshit Kejriwal photo viral on social media

प्रियांका, परिणीतीनंतर चोप्रा घराण्यातील 'ही' अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, दिल्लीच्या केजरीवाल कुटुंबाची झाली सून

मनोरंजन विश्वात गेले काही दिवस लग्नसराई सुरु आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी आपल्या जोडीदाराबरोबर विवाहबंधनात अडकत आहेत. अशातच बॉलिवूड मधील एक अभिनेत्री आता विवाहबंधनात अडकली आहे. प्रियांका चोप्रा आणि परिणिती चोप्रा यांची चुलत बहीण आणि अभिनेत्री मीरा चोप्रा नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. मंगळवार १२ मार्च रोजी जयपूरमध्ये व्यावसायिक रक्षित केजरीवालबरोबर मीराने लग्नगाठ बांधली. हा लग्न सोहळा पार पडताच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे लग्नाचे काही खास फोटो शेअर केले. यावेळी मीराने आपल्या लग्नात लाल रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला होता आणि रक्षितने लग्नात पांढरी शेरवानी परिधान केली होती.

मीराने हे फोटो शेअर करताना असे कॅप्शन दिले की, “आता नेहमी आनंद, भांडणं, हासू, आसू आणि आयुष्यभराच्या आठवणी, आता प्रत्येक जन्म तुझ्याबरोबरच…” मीराने अशी पोस्ट केल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. केजरीवाल आणि चोप्रा कुटुंबीयांच्या लग्नाआधीच्या सोहळ्याचेही फोटो सोशल मीडियाद्वारे समोर आले आहेत.

मीरा आणि रक्षित यांच्या लग्नाआधीच्या विधींना सोमवार (११ मार्च) रोजी मेहंदी व संगीत समारंभांनी सुरुवात झाली होती. गौरव चोप्रा, अर्जन बाजवा, मधुर भांडारकर आणि आनंद पंडित यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी संगीत रात्री हजेरी लावली. यावेळी प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा देखील उपस्थित होती.

View this post on Instagram

A post shared by Meera Chopra (@meerachopra)

आणखी वाचा – आजचे राशीभविष्य : आज ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार आर्थिक फायदा, तर ‘या’ राशीच्या लोकांसाठी व्यवसायात निर्माण होणार नवीन संधी, जाणून घ्या…

मीराच्या लग्नात प्रियांका व परिणीती चोप्रा या दोघी बहिणी दिसल्या नाहीत, शिवाय मन्नारा चोप्रादेखील गैरहजर होती. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार मीराच्या कुटुंबीयांशी त्यांचे एवढे चांगले संबंध नसल्याचे म्हटले जात आहे. याच कारणामुळे ते एकमेकांच्या कार्यक्रमात सहभागी झालेले नाहीत.

आणखी वाचा – ‘बिग बॉस १३’ फेम शेफाली जरीवालाचं विमानतळावरील पतीबरोबरचे ‘ते’ कृत्य पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “कुठेही काहीही…”

दरम्यान, मीरा ही तमिळ, तेलुगु तसेच हिंदी भाषांमधील अनेक चित्रपटात काम केले आहे. अनबे आरुयरे, बंगाराम, गँग्स ऑफ घोस्ट, सेक्शन ३७५, वाना, अर्जुन, १९२० लंडन आणि सफेद यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम करत तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याचबरोबर ‘द टॅटू मर्डर्स अँड हिकअप्स अँड हुकअप्स’ या वेब सीरिजमध्येही ती दिसली आहे.

Tags: bollywood actressBollywood entertainment newsentertainment newsMarriage Newsmeera chopraRakshit Kejriwalबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड मनोरंजन बातमीमनोरंजन बातमीमीरा चोप्रारक्षित केजरीवाललग्न बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Next Post
Richa chadha baby bump

रिचा चढ्ढाची गरोदरपणात अशी काळजी घेत आहे अली फझल, पोज देताना दिसले तेव्हा त्याने काय केलं पाहा?, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.