आपल्या जोडीदारावरील प्रेम सोशल मीडियाद्वारे व्यक्त करणे हे हल्ली फॅशन झाली असून अनेकजण यात अगदी मुक्तपणे सहभाग घेतात. त्यामुळे या कलाकार मंडळींचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊन ही कलाकार मंडळी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. अशा काही चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शेफाली जरीवाला. शेफाली जरीवाला ही नेहमीच तिचे बोल्ड फोटो शेअर करत सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. मात्र तिच्या एका कृतीमुळे ती सध्या ट्रोलिंगचे कारण बनली आहे.
शेफाली नुकतीच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. यावेळी तिचा नवरा पराग त्यागी हा तिला सोडण्यासाठी विमानतळावर आला होता. यावेळी दोघांनी पापाराझींसमोर एकमेकांना लिप किस केलं ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यानंतर, जेव्हा पापाराझींनी त्यांना पुन्हा असे करण्यास सांगितले तेव्हा दोघांनीही हसत-हसत पुन्हा एकमेकांना किस केले.
आणखी वाचा – आली लगीनघटिका समीप, पुलकित सम्राट व कृति खरबंदा यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात, पाहुणे मंडळीही जमली
याच व्हिडीओमुळे ती सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंगची शिकार झाली आहे. या व्हिडीओखाली अनेकांनी “यांना आता इथे गादी आणि अंथरूणदेखील आणून द्या. हे सगळं तुम्ही खासगीतही करु शकता, इथे विमानतळावर हे करायची काय गरज आहे?, दिखाऊपणासाठी हे कुठेही काहीही करतात” अशा अनेक नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. तर त्यांच्या काही चाहत्यांनी शेफाली-पराग यांच्या या कृतीचे कौतुक केले आहे.
शेफालीला ९० च्या दशकात आणि नंतरही ‘काटा लगा’ या गाण्याने खूप प्रसिद्धीझोतात आली. पण त्यानंतर ती काही काळ मनोरंजन सृष्टीपासून लांब होती. ‘बिग बॉस १३’ या रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाल्यानंतर ती पुन्हा चर्चेत आली. शेफालीने २००४ मध्ये संगीतकार हरमीत सिंगशी लग्न केले, पण २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर तिने २०१५ मध्ये पराग त्यागीशी लग्नगाठ बांधली