शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पंकज त्रिपाठी यांचा ‘मैं अटल हूँ’ चित्रपट आता ओटीटी प्रदर्शनासाठी सज्ज, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, जाणून घ्या…

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 12, 2024 | 6:39 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Pankaj tripathi movie Main atal hoon ott release on zee-5 see the details

पंकज त्रिपाठी यांचा ‘मैं अटल हूँ’ चित्रपट आता ओटीटी प्रदर्शनासाठी सज्ज, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, जाणून घ्या...

या वर्षाच्या सुरुवातीलाच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला आला होता. अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी अटल बिहारींची भूमिका साकारत साऱ्यांनाच अवाक केले होते. अशातच आता जवळपास दोन महिन्यांनी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे ज्यांना हा चित्रपट चित्रपटगृहांत जाऊन बघता आला नाही, ते हा चित्रपट ओटीटीवर पाहू शकणार आहेत. चला तर जाणून घेऊयात केव्हा आणि कुठे हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

झी-5 या ओटीटी माध्यमाने आपल्या सोशल मीडियावर चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. सोशल मीडियावर खास व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी येत्या १४ मार्च रोजी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले आहे. ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट अटल बिहारी वाजपेयी यांच्या वैयक्तिक जीवनावर आणि त्यांच्या राजकीय प्रवासावर आधारित आहे. अटल बिहारी हे केवळ एक पंतप्रधान म्हणून नव्हे तर कवी व राजकारणी म्हणूनही खूप प्रसिद्ध होते. या चित्रपटात पंकज त्रिपाठीसह पियुष मिश्रा, दया शंकर पांडे, राजा सेवक, एकता कौल यांसह अनेक कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

View this post on Instagram

A post shared by ZEE5 (@zee5)

आणखी वाचा – ‘लागिर झालं जी’ फेम अभिनेत्याचं उद्योग क्षेत्रात पदार्पण, सुरु केला स्वत:चा नवीन व्यवसाय, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

रवी जाधव दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती विनोद भानुशाली, संदीप सिंग आणि कमलेश भानुशाली यांनी भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओच्या बॅनरखाली केली आहे. हा चित्रपट १९ जानेवारी रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला होता. अशातच आता हा चित्रपट ओटीटीवरही प्रदर्शित होणार आहे. येत्या १४ मार्चपासून झी-५ वर प्रसारित होणार आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

आणखी वाचा – ‘या’ क्षेत्रात अनंत अंबानीची होणारी सासू नीता अंबानीलाही देते टक्कर, ग्लॅमरस अंदाज पाहून व्हाल थक्क

दरम्यान, पंकज त्रिपाठी यांच्या आगामी कामाबद्दल बोलायचे झाले लवकरच त्यांचा ‘मर्डर मुबारक’ चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्यांच्याबरोबर सारा अली खान, विजय वर्मा, डिंपल कपाड़िया, करिश्मा कपूर, संजय कपूर आणि टिस्का चोपड़ा यासारखे कलाकार आहेत. १५ मार्च, २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर हा चित्रपट येणार  आहे.

Tags: bollywood actorsBollywood entertainment newsbollywood moviesbollywood newsMain Atal Hoonott entertainment newsott newsPankaj Tripathiओटीटी बातमीओटीटी मनोरंजन बातमीपंकज त्रिपाठीबॉलिवूड अभिनेताबॉलिवूड चित्रपटबॉलिवूड बातमीबॉलिवूड मनोरंजन बातमीमैं अटल हूँ
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Next Post
pulkit samrat and kriti kharbanda marriage

आली लगीनघटिका समीप, पुलकित सम्राट व कृति खरबंदा यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात, पाहुणे मंडळीही जमली

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.