शनिवार, ऑगस्ट 29, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘लागिर झालं जी’ फेम अभिनेत्याचं उद्योग क्षेत्रात पदार्पण, सुरु केला स्वत:चा नवीन व्यवसाय, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 12, 2024 | 4:58 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Lagira Zhala Ji talent fame Mahesh Jadhav started his new business in phaltan see the details

‘लागिर झालं जी’ फेम अभिनेत्याचं उद्योग क्षेत्रात पदार्पण, सुरु केला स्वत:चा नवीन व्यवसाय, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

गेल्या अनेक दिवसांत मराठीतील अनेक कलाकार मंडळींनी अभिनयाव्यतिरिक्त उद्योग क्षेत्रातही त्यांची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी नाटक, मालिका किंवा चित्रपट या माध्यमांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याव्यतिरिक्त ही कलाकार मंडळी स्वत:च्या व्यवसायातही आपला ठसा उमटवत आहेत. सुप्रिया पाठारे, निरंजन कुलकर्णी, अभिज्ञा भावे, तेजस्विनी पंडित, प्रार्थना बेहरे, यशोमान आपटे, श्रेया बुगडे, अरबाज शेख, हार्दिक जोशीसारख्या अनेक कलाकारांनी छोटासा का होईना स्वत:चा व्यवसाय सुरु करत उद्योग क्षेत्रात पदार्पण केले आहे.

यात आता आणखी एक लोकप्रिय अभिनेत्याची भर पडली आहे. ‘लागीरं झालं जी’ मालिकेतील ‘टॅलेंट’ म्हणजेच महेश जाधवनेही उद्योग क्षेत्रात पदार्पण केलं आहे. महेश जाधवने फलटणमध्ये स्वतःचा फूड ट्रक सुरू केला आहे. ‘हॅलो शॉरमा’, असं फूड ट्रकचं नाव आहे. काल, ११ जानेवारीपासून हा फूड ट्रक महेशने मित्राच्या साथीने सुरू केला आहे. यासंदर्भात अभिनेत्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.  हा फूड ट्रक फलटणमधल्या डीएड चौकात असून, या खास व्हिडीओद्वारे शक्य असल्यास भेट देण्याचं आवाहनही त्याने केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Mahesh Jadhav (@mahesh_jadhav15)

आणखी वाचा – रामाची भूमिका साकारण्यावरुन अरुण गोविल यांनी रणबीर कपूरबाबत केलेलं विधान चर्चेत, म्हणाले, “या भूमिकेसाठी…”

महेशच्या या नवीन व्यवसायाला मराठी कलाकार मंडळींकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अक्षया देवधर, किरण गायकवाड, रोहित चव्हाण, अनुष्का सरकटे, महेश घाग यासह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी महेशला त्याच्या या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्याचे कौतुकही केले आहे. त्याचबरोबर त्याच्या अनेक चाहत्यांनीदेखील त्याचे नवीन व्यवसायानिमित्त कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.  

आणखी वाचा – लेकीच्या डेटच्या चर्चांना बोनी कपूर यांनी दिला पूर्णविराम?, शिखर पहाडियाबरोबर दिसले पण…; नेमकं काय घडलं?

दरम्यान, महेशने ‘लागीर झालं जी’ मालिकेसह ‘कारभारी लय भारी’ सारख्या अनेक मालिकेतही अभिनय केला आहे. पण त्याच्या लागीर झालं जी मालिकेतील टॅलेंट या पात्राने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मालिकांशिवाय अनेक मराठी चित्रपटांद्वारे मोठ्या पडद्यावरही तो झळकला आहे. इतकंच नाही तर अभिनयासोबत महेशनं क्रिडा क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Tags: नवीन व्यवसायमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी मनोरंजन बातमीमराठी बातमीमहेश जाधवटॅलेंटentertainment newsLagira Zhala JiMahesh Jadhavmarathi actorMarathi Entertainment Newsलागिर झालं जीMarathi newsnew businessTalent
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Titeeksha Tawde Maharashtrian Look

निळ्या रंगाची साडी, पारंपरिक दागिने अन्…; लग्नानंतर अशी नटली तितीक्षा तावडे, मराठमोळा लूक व्हायरल, अभिनेत्री म्हणते, “मराठी मुलगी…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.