या वर्षाच्या सुरुवातीलाच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला आला होता. अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी अटल बिहारींची भूमिका साकारत साऱ्यांनाच अवाक केले होते. अशातच आता जवळपास दोन महिन्यांनी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे ज्यांना हा चित्रपट चित्रपटगृहांत जाऊन बघता आला नाही, ते हा चित्रपट ओटीटीवर पाहू शकणार आहेत. चला तर जाणून घेऊयात केव्हा आणि कुठे हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
झी-5 या ओटीटी माध्यमाने आपल्या सोशल मीडियावर चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. सोशल मीडियावर खास व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी येत्या १४ मार्च रोजी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले आहे. ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट अटल बिहारी वाजपेयी यांच्या वैयक्तिक जीवनावर आणि त्यांच्या राजकीय प्रवासावर आधारित आहे. अटल बिहारी हे केवळ एक पंतप्रधान म्हणून नव्हे तर कवी व राजकारणी म्हणूनही खूप प्रसिद्ध होते. या चित्रपटात पंकज त्रिपाठीसह पियुष मिश्रा, दया शंकर पांडे, राजा सेवक, एकता कौल यांसह अनेक कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.
रवी जाधव दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती विनोद भानुशाली, संदीप सिंग आणि कमलेश भानुशाली यांनी भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओच्या बॅनरखाली केली आहे. हा चित्रपट १९ जानेवारी रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला होता. अशातच आता हा चित्रपट ओटीटीवरही प्रदर्शित होणार आहे. येत्या १४ मार्चपासून झी-५ वर प्रसारित होणार आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
आणखी वाचा – ‘या’ क्षेत्रात अनंत अंबानीची होणारी सासू नीता अंबानीलाही देते टक्कर, ग्लॅमरस अंदाज पाहून व्हाल थक्क
दरम्यान, पंकज त्रिपाठी यांच्या आगामी कामाबद्दल बोलायचे झाले लवकरच त्यांचा ‘मर्डर मुबारक’ चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्यांच्याबरोबर सारा अली खान, विजय वर्मा, डिंपल कपाड़िया, करिश्मा कपूर, संजय कपूर आणि टिस्का चोपड़ा यासारखे कलाकार आहेत. १५ मार्च, २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर हा चित्रपट येणार आहे.