सध्या बॉलिवूडमध्ये लग्नसराई सुरू आहे. जॅकी भगनानी व रकुल प्रीत यांच्यानंतर आता अभिनेता पुलकित सम्राट व अभिनेत्री क्रीती खरबंदा ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. ही जोडी बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होती. आता या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. पुलकित व क्रीतीने मानेसर येथे जवळचे नातेवाईक व मित्र-मंडळींच्या उपस्थितीमध्ये लग्न करणार आहेत. त्यांचे लग्न पंजाबी रितीरिवाजानुसार होणार असल्याची माहिती मिळाली आहे. (pulkit samrat and kriti kharbanda marriage)
गेल्या अनेक दिवसांपासून पुलकित व कृती ही डेट करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या, मात्र दोघांनी अचानक लग्न करण्याची घोषणा केली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांच्याही लागायचे विधी दिल्लीमध्ये सुरू झाले आहेत. दोघंही मानेसर येथील एका हॉटेलमध्ये १५ मार्च रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. त्याआधी १३ तारखेपासूनच सर्व कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.
दोघंही पंजाबी रितीरिवाजाप्रमाणे लग्न करणार असून लग्नासाठी पेस्टल थीम निवडली आहे. पण दोघांच्याही लग्नाला खूप कमी मंडळींची उपस्थिती राहणार असल्याचे समजले आहे. सूत्रानुसार त्यांच्या लग्नाला मनोरंजन क्षेत्रातील काही निवडक कलाकारच उपस्थित राहणार आहेत. यामध्ये फरहान अख्तर, शिबानी दांडेकर-अख्तर, झोया अख्तर, रितेश सिधवानी, लव रंजन,रिचा चढ्ढा, अली फजल, वरुण शर्मा, मनज्योत सिंह व मिका सिंह ही सहभागी होतील.
पुलकित व क्रिती हे हरियाणामधील मानेसर येथे लग्न करणार असून आयटीसी ग्रँड भारत पॅलेसमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. हे एक आलीशान हॉटेल असून ३०० एकरमध्ये याचा विस्तार आहे. यामध्ये प्रायव्हेट पूल आहे तसेच ४ प्रेसिडेंशीयल व्हीला आणि १०० डिलक्स सुट्स आहेत.
काही दिवसांपूर्वी दोघांच्याही लग्नाची पत्रिका सोशल मीडियार व्हायरल होत होती. या पत्रिकेवर या जोडीचा एक कोलाज बनवला होता. या पत्रिकेची चाहत्यांनी खूप प्रशंसाही केली होती आणि शुभेच्छाही दिल्या होत्या. ‘पागलपंती’च्या सेटवर दोघांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. पुलकितचे हे दुसरं लग्न असून याआधी त्याचे श्वेता रोहारीबरोबर लग्न झाले होते. पण काही काळानंतर दोघांचा घटस्फोट झाला.