शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बॉयफ्रेंडसह लग्न करण्यासाठी दुबईमध्ये गेली ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री, पण त्यानेच फसवलं, तुरुंगातही जावं लागलं अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 9, 2024 | 8:00 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Sofia hayat viral post

बॉयफ्रेंडसह लग्न करण्यासाठी दुबईमध्ये गेली 'बिग बॉस' फेम अभिनेत्री, पण त्यानेच फसवलं, तुरुंगातही जावं लागलं अन्...

‘बिग बॉस ७’मध्ये दिसलेली सोफिया हयात ही नेहमी चर्चेत असते. सोफिया अध्यात्म गुरु बनली होती.  नुकताच तिच्या आयुष्यात जो प्रकार घडला तो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. सोफियाला ३१ डिसेंबर २०२३ ला दुबई एअरपोर्टवर अटक केले आणि तुरुंगातही डांबले होते. तिने तिचा हा भयंकर अनुभव इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सर्वांबरोबर शेअर केला आहे. तिच्याबरोबर असं का घडलं? आणि या प्रसंगाला ती कशी सामोरी गेली? याबद्दल सांगितले आहे. (Sofia hayat viral post)

सोफियाने सांगितलं की, “माझा एक्स-बॉयफ्रेंड मुबारक आइसा मुबारक मोहम्मद अल मेराखीबरोबर लग्न करण्यासाठी दुबई येथे गेली होती. पण एअरपोर्टला पोहोचताच तिला अटक केले”. पण असे का केले याबद्दल कोणीही काहीही सांगण्यास तयार नव्हते.मी दुतावासामध्ये कॉल करण्याची विनंती केली. पण मला करु दिला नाही. पिंजऱ्यासारख्या छोट्याश्या तुरुंगात बंद करुन ठेवले होते. मला बरं वाटत नव्हतं”.

आणखी वाचा – करण कुंद्राच्या श्रीमंतीकडे पाहून शिल्पा शेट्टीने केलं लग्न, अभिनेत्रीला प्रश्न विचारताच संतापली, म्हणाली, “पैसेवाला जोडीदार…”

View this post on Instagram

A post shared by Sofia Hayat (@sofiahayat)

पुढे ती म्हणाली की, “६ तास तुरुंगात राहिल्यानंतर एक महिला पोलिस आली आणि मला पोलिस व्हॅनमधून दुबई पोलिस स्टेशनला घेऊन जाण्यात आले. त्या बंद गाडीत माझा श्वास गुदमरू लागला होता. मी त्यांना सारखी विचारत होते की मला का पकडण्यात आलं आहे? यावर त्यांनी मी एका व्यक्तीकडून ५ लाख ३२ हजार रुपये जबरदस्ती वसूल करत आहे आणि पैसे दिले नाही तर अश्लील व्हिडीओ शेअर करण्याची धमकीही देत आहे असे सांगितले. हे ऐकून मला धक्का बसला आणि मी रडू लागले. हा सर्व प्रकार माझ्या एक्स बॉयफ्रेंडनेच केला होता. त्याच्याकडून मला पैसे मिळणे बाकी होते पण त्याला माझे पैसे परत द्यायचे नव्हते म्हणून त्याने पोलिसांना खोटं सांगितलं होतं”.

आणखी वाचा- “त्याचं पूनम पांडेसारखं…”, पूर्वाश्रमीचा पती आदिल खानच्या दुसऱ्या लग्नावर राखी सावंतची प्रतिक्रिया, म्हणाली, “पब्लिसिटी स्टंट…”

नंतर सोफिया म्हणाली की, “जेव्हा पोलिसांनी माझा फोन तपासला तेव्हा मी पाठवलेला मेसेज पाहिला. त्यामध्ये मी लिहिले होते की, तू माझे पैसे दिले नाहीस तर मी तुझा चेहरा सोशल मीडियावर व्हायरल करेन आणि तू काय केलंस हे सर्व जगाला सांगेन. दुबईमध्ये असं करणं मोठा गुन्हा आहे. यासाठी २ वर्षाचा तुरुंगवास आणि ५०,००० पाउंड दंड लागू शकतो. माझ्या केवळ मेसेजमुळे मला त्यांनी सोडून दिले”.

सोफियाने तिची सर्व आपबिती सांगितली आहे. यावर नेटकरी अनेक प्रतिक्रियाही देत आहेत.

Tags: arrest in dubaibig boss fame actressboyfrienddubaidubai airport
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Today 10 march 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

आजचे राशीभविष्य : ‘या’ राशीच्या लोकांसाथी आजचा दिवस ठरणार वरदान, धनप्राप्ती व नोकरीत बढतीचाही आहे योग, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.