शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : …अन् देवेंद्र फडणवीस भाषणासाठी उभे राहताच स्टेजवरुन उठून गेले अमोल कोल्हे, राग व्यक्त करत म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांना…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 4, 2024 | 4:01 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
amol kolhe left the programme while chief minister devendra fadnavis started speech

Video : ...अन् देवेंद्र फडणवीस भाषणासाठी उभे राहताच स्टेजवरुन उठून गेले अमोल कोल्हे, राग व्यक्त करत म्हणाले, "छत्रपती संभाजी महाराजांना..."

लोकसभा निवडणूक ही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे देशभरासह राज्यात सत्ताधारी व विरोधकांमध्ये आतापासूनच राडा सुरू झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच एका कार्यक्रमात खासदार व अभिनेते अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या चालू भाषणातून काढता पाय घेतला. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुण्यातील वढू तुळापूर येथील धर्मवीर संभाजी महाराज यांच्या स्मारकाचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. पण कार्यक्रम पत्रिकेवर खासदार अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांचे नावच नव्हते. अमोल कोल्हे कोल्हे व आमदार पवार यांना या कार्यक्रमात दुय्यम स्थान दिले गेले. त्यामुळे अमोल कोल्हे व पवार यांनी कार्यक्रम अर्धवट सोडला. विशेष म्हणजे, देवेंद्र फडणवीस हे भाषणाला उभे राहताच अमोल कोल्हे हे स्टेजवरुन कार्यक्रम सोडून निघून गेले. खासदार अमोल कोल्हे अचानक कार्यक्रम सोडून गेल्यामुळे एकच खळबळ उडाली.

View this post on Instagram

A post shared by Sarpanch Swapnil Gaikwad (@swapnilgaikwad23)

आणखी वाचा – शाळेत प्रवेश, धमाल-मस्ती अन्…; बहुचर्चित ‘आठवी अ’ वेबसीरिजचा पहिला भाग प्रदर्शित, दुसरा भाग कधी येणार?

याबद्दल अमोल कोल्हेंनी एबीपी माझाला त्यांची प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांनी असं म्हटलं की, “मुळात या कार्यक्रमासाठी मला रात्री उशिरा निमंत्रण मिळाले. कार्यक्रमामधील फ्लेक्सवर छत्रपती संभाजी महाराजांना स्थान देण्यात आलेलं नाही. फक्त राजकीय पक्षांचे झेंडे दिसून येत आहेत”. तसेच या कार्यक्रमात फक्त नेत्यांचे फोटो दिसून आल्याने हा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान असल्याची टीकाही कोल्हेंनी केली.

आणखी वाचा – “जागो जागी होई मला याचाच भास…”,  ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता-सौरभचा एकमेकांसाठी भन्नाट उखाणा, मंडपातच एकमेकांना घास भरवला अन्…

दरम्यान, अमोल कोल्हे यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून कुणी अमोल कोल्हेंच्या या कृतीचे समर्थन केले आहे, तर कुणी त्यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी या व्हिडीओखाली संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असल्याचे पहीला मिळत आहे.  

Tags: amol kolheDeputy Chief Minister Devendra Fadnavisentertainment newsmarathi entertainment newsMarathi newsMP and Actor Amol Kolheअमोल कोल्हेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसखासदार व अभिनेते अमोल कोल्हेमनोरंजन बातमीमराठी बातमीमराठी मनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
katrina kaif pregnancy

Video : दीपिका पदुकोणनंतर कतरिना कैफही देणार गुडन्यूज?, अंबानींच्या पार्टीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल, गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.