मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“जागो जागी होई मला याचाच भास…”,  ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता-सौरभचा एकमेकांसाठी भन्नाट उखाणा, मंडपातच एकमेकांना घास भरवला अन्…

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 4, 2024 | 1:17 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Yogita Chavan Saorabh Choughule took a special ukhana for each other in their wedding

“जागो जागी होई मला याचाच भास...", 'जीव माझा गुंतला' फेम योगिता-सौरभचा एकमेकांसाठी भन्नाट उखाणा, मंडपातच एकमेकांना घास भरवला अन्...

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्यामुळे लग्न समारंभ साजरा करतानाही  अनेक विविधता दिसून येते. महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये लग्नाच्या वेळी अनेक प्रथा पाळल्या जातात. त्यात उखाणा हा सर्वात महत्त्वाचा असतो. लग्नाच्या वेळी नवरी किंवा नवरदेव लयबद्ध पद्धतीने आपल्या जोडीदाराचे नाव घेतात. त्यालाच उखाणा घेणे असं म्हणतात. अशाच एका हटके उखाण्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे आणि हा हटके उखाणा आहे सौरभ चौघुले व योगिता चव्हाण यांचा.

‘जीव माझा गुंतला’ फेम अभिनेत्री योगिता चव्हाण व अभिनेता सौरभ चौघुले ही लोकप्रिय जोडी नुकतीच लग्नबंधनात अडकली. सोशल मीडियावरुन थेट लग्नाचे फोटो शेअर करत या दोघांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. अशातच त्यांच्या उखाण्यांच्या व्हिडीओनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आणखी वाचा – ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’मधील बाळूमामांची भूमिका साकारणाऱ्या सुमित पुसावळेने सोडली मालिका, आता नव्या कलाकाराची एन्ट्री

लग्नानंतर सौरभ व योगिता यांनी जेवणाच्या वेळी एकमेकांना घास भरवत खास उखाणे घेतले. यावेळी सौरभने योगितासाठी खास उखाणा घेत असं म्हटलं की, “एक होती चिऊ, एक होता काऊ, योगिताला घास भरवताना वाट कुणाची पाहू”. तर योगितानेही सौरभसाठी हटके उखाणा घेत असं म्हटलं की, “जागो जागी होई मला याचाच भास, सौरभचं नाव घेते भरवून भाताचा घास”. दोघांचे हे उखाणे उपस्थितांनाही चांगलेच आवडले असून त्यांनी या दोघांना टाळ्या वाजवत दाद दिली असल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Video : करीना कपूरचा लेक भलताच खट्याळ, जीभ काढून कॅमेऱ्यामॅनलाच चिडवून दाखवलं, आई हात धरुन खेचू लागली अन्…; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, योगिता व सौरभ यांच्या उखाण्यांचे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी कमेंट्समध्ये हा उखाणा आवडला असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.  

Tags: entertainment newsmarathi entertainment newsMarathi newssaorabh choughuleyogita chavanYogita Chavan Saorabh Choughule MarriageYogita Chavan Saorabh Choughule Marriage Marathi NewsYogita Chavan Saorabh Choughule Marriage Newsमनोरंजन बातमीमराठी बातमीमराठी मनोरंजन बातमीयोगिता चव्हाणयोगिता चव्हाण सौरभ चौघुले लग्नयोगिता चव्हाण सौरभ चौघुले लग्न बातमीयोगिता चव्हाण सौरभ चौघुले लग्न मराठी बातमीसौरभ चौघुले
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Anant Ambani and Radhika Merchant Pre Wedding Celebration Updates in Marathi

Video : हजारो मंडळींच्या उपस्थितीत अंबानी कुटुंबियांच्या सूनेची नाचत एन्ट्री, अनंत अंबानी एकटक पाहत बसला अन्…; सुंदर व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.