भारतीय क्रिकेट संघाचा दमदार खेळाडू विराट कोहली व प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी नुकतीच आई-बाबा झाल्याची गुडन्यूज शेअर केली आहे. २० फेब्रुवारी रोजी विराट-अनुष्का यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. १५ फेब्रुवारीला अनुष्काने एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळाचा जन्म झाल्यावर पाच दिवसांनी विराट-अनुष्का यांनी ही गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अकाय कोहलीचा जन्म झाला तेव्हा गजकेसरी योग तयार होत होता. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. या योगात जन्माला आलेली मुले राजाप्रमाणे आयुष्य जगतात. तर जाणून घेऊयात अकाय कोहलीची कुंडली काय सांगते.
अकायची जन्मदिवशी म्हणजेच १५ फेब्रुवारी रोजी विराट-अनुष्काच्या मुलाचा जन्म झाला. ज्योतिषशास्त्रानुसार त्या दिवशी ग्रहांची स्थिती खूप शुभ होती. चंद्र मेष राशीत होता आणि भगवान बृहस्पति देखील या राशीत उपस्थित होता. त्यामुळे मेष राशीत गजकेसरी योग तयार झाला. हा योग अत्यंत शुभ मानला जातो.
याशिवाय १५ फेब्रुवारीला कुंभ राशीत सूर्य व शनि एकत्र होते. इतर ग्रहांची स्थितीही अनुकूल होती. याशिवाय ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीमध्ये गुरू व चंद्राचा संयोग झाल्यास हा योग तयार होतो. त्यामुळे हा योग सर्वांत शक्तिशाली मानला जातो. तसेच गजकेसरी योगात जन्मलेली मुले खूप हुशार असतात. याशिवाय समाजात तो खूप नाव कमावतो, याशिवाय, त्यांना त्यांच्या कारकिर्दीत प्रचंड यशही मिळते.
तसेच अकाय कोहलीच्या जन्मावेळी कुंडलीत मंगळ उच्च राशीत होता. त्यामुळे अनुष्का-विराटच्या मुलाला आयुष्यात भरपूर यश मिळणार आहेत. तसेच त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. एवढेच नाही तर मुलाच्या जन्मानंतर त्याच्या पालकांचीही खूप प्रगती होईल असे म्हटले जात आहे. दरम्यान, ‘अकाय’ या नावाचा एक अर्थ ‘तेजस्वी’ किंवा ‘चमकणारा चंद्र’ असा होतो. तर दूसरा अर्थ म्हणजे ‘निराकार’ असा होतो. ‘निराकार’ म्हणजे ज्याला कोणताही स्थिर आकार नाही. असा ‘निराकार’.