सोमवार, मे 19, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विराट कोहली व अनुष्का शर्माचा लेक अकायचं पुढील भविष्य काय?, संपूर्ण भविष्य कुंडली आली समोर, त्याचा जन्म झाला तेव्हा…

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 23, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Virat kohli anushka sharma son name akaay meaning and his kundli

विराट कोहली व अनुष्का शर्माचा लेक अकायचं पुढील भविष्य काय?, संपूर्ण भविष्य कुंडली आली समोर, त्याचा जन्म झाला तेव्हा...

भारतीय क्रिकेट संघाचा दमदार खेळाडू विराट कोहली व प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी नुकतीच आई-बाबा झाल्याची गुडन्यूज शेअर केली आहे. २० फेब्रुवारी रोजी विराट-अनुष्का यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. १५ फेब्रुवारीला अनुष्काने एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळाचा जन्म झाल्यावर पाच दिवसांनी विराट-अनुष्का यांनी ही गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अकाय कोहलीचा जन्म झाला तेव्हा गजकेसरी योग तयार होत होता. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. या योगात जन्माला आलेली मुले राजाप्रमाणे आयुष्य जगतात. तर जाणून घेऊयात अकाय कोहलीची कुंडली काय सांगते.

अकायची जन्मदिवशी म्हणजेच १५ फेब्रुवारी रोजी विराट-अनुष्काच्या मुलाचा जन्म झाला. ज्योतिषशास्त्रानुसार त्या दिवशी ग्रहांची स्थिती खूप शुभ होती. चंद्र मेष राशीत होता आणि भगवान बृहस्पति देखील या राशीत उपस्थित होता. त्यामुळे मेष राशीत गजकेसरी योग तयार झाला. हा योग अत्यंत शुभ मानला जातो.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

आणखी वाचा – अनेक पुरस्कार व प्रेक्षकांच्या प्रेमाने सन्मानित झालेला ‘ओपेनहायमर’ आता ओटीटी प्रदर्शनासाठी सज्ज, मोफत पाहता येणार, वाचा कधी व कुठे?

याशिवाय १५ फेब्रुवारीला कुंभ राशीत सूर्य व शनि एकत्र होते. इतर ग्रहांची स्थितीही अनुकूल होती. याशिवाय ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीमध्ये गुरू व चंद्राचा संयोग झाल्यास हा योग तयार होतो. त्यामुळे हा योग सर्वांत शक्तिशाली मानला जातो. तसेच गजकेसरी योगात जन्मलेली मुले खूप हुशार असतात. याशिवाय समाजात तो खूप नाव कमावतो, याशिवाय, त्यांना त्यांच्या कारकिर्दीत प्रचंड यशही मिळते.

आणखी वाचा – ‘चला हवा येऊ द्या’मधून निलेश साबळेची एक्झिट, स्वतःच केला खुलासा, प्रकृती ठिक नसल्यामुळे मोठा निर्णय, म्हणाला, “गेले काही दिवस…”

तसेच अकाय कोहलीच्या जन्मावेळी कुंडलीत मंगळ उच्च राशीत होता. त्यामुळे अनुष्का-विराटच्या मुलाला आयुष्यात भरपूर यश मिळणार आहेत. तसेच त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. एवढेच नाही तर मुलाच्या जन्मानंतर त्याच्या पालकांचीही खूप प्रगती होईल असे म्हटले जात आहे. दरम्यान,  ‘अकाय’ या नावाचा एक अर्थ ‘तेजस्वी’ किंवा ‘चमकणारा चंद्र’ असा होतो. तर दूसरा अर्थ म्हणजे ‘निराकार’ असा होतो. ‘निराकार’ म्हणजे ज्याला कोणताही स्थिर आकार नाही. असा ‘निराकार’.

Tags: Akay Kohlianushka sharmaBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsvirat kohliअकाय कोहलीअनुष्का शर्माबॉलिवूड बातमीमनोरंजन बातमीविराट कोहली
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Sharmila Shinde Shares Experience
Entertainment

“सीनमध्ये बाळ गेलं पण…”, ‘नवरी मिळे…’मधल्या दुर्गाला खऱ्या आयुष्यात झाला शारिरीक त्रास, म्हणाली, “रडले, रागावले…”

मे 19, 2025 | 7:00 pm
achint kaur struggle for work
Entertainment

१८व्या वर्षातच लग्न, घटस्फोट, बॉयफ्रेंडचीही पाठ; आता कामासाठी वणवण फिरतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री, ओळखणंही कठीण

मे 19, 2025 | 6:38 pm
worms and fungus in dairymilk Cadbury
Entertainment

कॅडबरीमध्ये अळ्या, बुरशी अन्…; साताऱ्याच्या डी-मार्टमधील धक्कादायक प्रकार, मराठी अभिनेत्रींनी शूट केला व्हिडीओ

मे 19, 2025 | 5:45 pm
Shilpa shirodkar corona positive
Entertainment

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला करोना, मुंबईत पुन्हा वाढले रुग्ण, आता परिस्थिती अशी की…

मे 19, 2025 | 4:55 pm
Next Post
मराठी वेबसीरिज

शाळेसारखं निरागस काहीच नसतं, मग ते प्रेम असो वा…; मराठीतील नवी कोरी वेबसीरिज ‘आठवी अ’चं पोस्टर प्रदर्शित

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.