शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Dadasaheb Phalke Awards 2024 : सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला शाहरुख खान, तर बॉबी देओलचाही सन्मान, वाचा संपूर्ण यादी

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 21, 2024 | 12:14 pm
in Entertainment
Reading Time: 4 mins read
google-news
Dadasaheb phalke international film festival awards 2024 see the winners list

Dadasaheb Phalke Awards 2024 : सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला शाहरुख खान, तर बॉबी देओलचाही सन्मान, वाचा संपूर्ण यादी

मनोरंजन सृष्टीतील काही महत्त्वाच्या पुरस्कार सोहळ्यांमधील दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा सर्वात मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे. बॉलिवूडसह मराठी मनोरंजन सृष्टीतील कलाकारांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या सिनेजगतातली अनेक कलाकार मंडळी या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यावर बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, रणबीर कपूर व बॉबी देओल यांसह अनेक कलाकारांनी आपली मोहोर उमटवली.  

काल (२० फेब्रुवारी) रोजी मुंबईतील ताज लँड्स एंडमध्ये झालेल्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळ्यात ‘जवान’ चित्रपटाचा दिग्दर्शक एटली त्याची पत्नी प्रियाबरोबर आला होता. या पुरस्कार सोहळ्यात बॉबी देओल, शाहिद कपूर, करिना कपूर, शाहरुख खान, राणी मुखर्जीसह अनेक कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. बॉलिवूडचा किंगखान शाहरुखने ‘जवान’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या विजेतेपदावर त्याचे नाव कोरले, तर अभिनेत्री नयनताराने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या विजेतेपद आपले पटकावले.

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

आणखी वाचा – समुद्रकिनारी क्रिकेट, वेगळाच लूक अन्…; प्रथमेश परबने होणाऱ्या बायकोसह केलं हटके फोटोशूट, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आणि…

दादासाहेब फाळके पुरस्कार आंतरराष्ट्रीय पुरस्कार २०२४ मध्ये कोणाला कोणता पुरस्कार मिळाला हे जाणून घ्या.

सर्वोत्कृष्ट अभिनेता – शाहरुख खान (जवान)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – नयनतारा (जवान)
सर्वोत्कृष्ट खलनायक – बॉबी देओल (अ‍ॅनिमल)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – संदीप रेड्डी वांगा (अ‍ॅनिमल)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) – विक्की कौशल (सॅम बहादुर) 

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

आणखी वाचा – विराट कोहली व अनुष्का शर्माने लेकाचं नाव ठेवलं ‘अकाय’, हे नाव ठेवण्यामागचा नेमका उद्देश काय?, नावाचा अर्थ आहे…

२०२३ हे वर्ष शाहरुख खानसाठी अधिकच खास होते. गेल्या वर्षात शाहरुख खानचे जवान, पंथाम व डंकी असे तीन चित्रपट प्रदर्शित झाले होते. यापैकी डंकी चित्रपट सोडल्यास जवान व पठाण या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. या चित्रपटांना चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली तर रणबीर कपूरसाठीही गेले वर्ष खूपच खास होते. रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. या चित्रपटाने जवळपास ९०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. यात बॉबी देओलच्या खलनायकाच्या भूमिकेनेही अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

दरम्यान, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२४ हा पुरस्कार सोहळा झी-५ या ओटीटी माध्यमावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Tags: bobby deolbollywood actorsBollywood entertainment newsDadasaheb phalke international film festival awards 2024entertainment newsranbir kapoorshah rukh khanदादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२४बॉबी देओलबॉलिवूड अभिनेतेमनोरंजन बातमीरणबीर कपूरशाहरुख खान
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Maharashtrachi Hasyajatra Fan Moment

Video : हातगाडीवर नाश्ताचे पदार्थ विकत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघत होती महिला, प्रियदर्शिनी इंदलकरने पाहिलं अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.