‘प्री-वेडिंग फोटोग्राफी’ हा शब्द सध्या परवलीचा झाला आहे. प्री-वेडिंग शूट हे सध्याचं वेड आहे आणि हे वेड आजच्या प्रत्येक तरुणाईला लागलं आहे. कलाकार विश्वातदेखील या प्री-वेडिंग शूटची भलतीच क्रेझ असल्याची पाहायला मिळत आहे. अशातच सोशल मीडियावर एक प्री-वेडिंग व्हिडीओची चर्चा सुरु आहे आणि हा प्री- वेडिंग व्हिडीओ आहे लाडक्या दगडूचा, म्हणजेच अभिनेता प्रथमेश परबचा.
सोशल मीडियावर गेले काही दिवस अभिनेता प्रथमेश परब व गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच प्रथमेश व क्षितिजा यांचा साखरपुडा सोहळा अगदी थाटामाटात संपन्न झाला. यावेळी प्रथमेशने क्षितिजासह रोमॅंटिक डान्स केला होता, तसेच या सोहळ्यात प्रथमेशच्या आई-वडिलांनीदेखील ठेका धरल्याचे पाहायला मिळाले होते. प्रथमेश-क्षितिजा यांच्या साखरपुड्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच त्यांचा हा नवीन प्री-वेडिंगचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – दुसऱ्यांदा आई-बाबा झाले विराट कोहली व अनुष्का शर्मा, अभिनेत्रीने मुलाला दिला जन्म, नाव ठेवलं…
प्रथमेश व क्षितिजा यांनी त्यांच्या या प्री-वेडिंग शूटसाठी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. क्षितिजाने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली असून त्यावर स्लीवलेस ब्लाऊज परिधान केला आहे, तर प्रथमेशने कुर्ता पायजमा व त्यावर लाल रंगाचे नक्षीकाम असलेलं मफलर घेतलं आहे. अथांग समुद्रकिनारी त्यांनी हे प्री-वेडिंग शूट केले असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर या व्हिडीओमध्ये क्षितिजाने प्रथमेशला वाढदिवसानिमित्त दिलेली बॅटही पाहायला मिळत असून या बॅटने ते दोघं समुद्रकिनारी क्रिकेटही खेळत आहेत.
या व्हिडीओला श्रेया घोषालच्या सुमधुर आवाजातील ‘क्या कहे दिल से धडकने है पागल’ हे रोमॅंटिक गाणं लावण्यात आले आहे. तर प्रथमेश-क्षितिजा यांनीही या गाण्यावर रोमॅंटिक अंदाजात फोटोशूट केलं आहे. दरम्यान, या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच येत्या २४ तारखेला हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना तांच्या लग्नाची चांगलीच उत्सुकता लागली आहे.