रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मुलींना मानसिक, शारीरिक त्रास…”, पत्नीच्या आरोपांनंतर ‘महाभारत’ फेम नितीश भारद्वाज यांचं पुन्हा एकदा स्पष्टीकरण, म्हणाले, “मुलींचा ताबा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 21, 2024 | 11:52 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Nitish Bhardwaj on children custody

“मुलींना मानसिक, शारीरिक त्रास...”, पत्नीच्या आरोपांनंतर 'महाभारत' फेम नितीश भारद्वाज यांचं पुन्हा एकदा स्पष्टीकरण, म्हणाले, "मुलींचा ताबा..."

महाभारत’ मालिकेमध्ये भगवान श्री कृष्णाच्या भूमिकेमुळे अभिनेते नितीश भारद्वाज घराघरांमध्ये पोहोचले. सध्या नितीश हे त्यांच्या कौटुंबिक कारणांमुळे चर्चेत आले आहेत. नितीश भारद्वाज व त्यांच्या पत्नी यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. सध्या नितीश व त्यांची पत्नी स्मिता वेगळे राहत असून मुलींचा ताबा मिळावा यासाठी दोघांनी न्यायालयात धाव घेतली असल्याचं समोर आलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये नितीश यांनी स्मिता यांच्याकडे मुलींचा ताबा असल्याचा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे. (Nitish Bhardwaj on children custody)

‘इटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नितीश यांनी सांगितले की, “स्मिता माझ्यापासून वेगळी राहत आहे आणि ती सगळीकडे खोटी माहिती पसरवत आहे. मी माझ्या एका व्हिडीओमध्ये २३ मे २०२३चा न्यायालयाचा आदेश दाखवला होता ज्यामध्ये न्यायाधीशांनी मुलींचा ताबा अजून कोणालाही दिलेला नाही असे जाहीर केले आहे. यावर अजून चर्चा झालेली नाही. सर्व चर्चा झाल्यानंतरच मुलींचा ताबा कोणाला मिळणार हे ठरणार आहे.”

आणखी वाचा – विराट कोहली व अनुष्का शर्माने लेकाचं नाव ठेवलं ‘अकाय’, हे नाव ठेवण्यामागचा नेमका उद्देश काय?, नावाचा अर्थ आहे…

View this post on Instagram

A post shared by Nitish Bharadwaj (@nitishbharadwaj.krishna)

पुढे ते म्हणाले की, “जोपर्यंत मुलींचा ताबा मिळण्याचे प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत आई ही कस्टोडिअल पालक आहे आणि माझ्याकडे जर मुलांचा ताबा नसेल तर मुलांबद्दलची सर्व माहिती मला सांगणे गरजेचे असते. इतकेच नाही तर जेव्हा-जेव्हा ताबा घेण्याबाबत भांडण होते तेव्हा कायद्यानुसार कौटुंबिक न्यायालय आपोआप मुलाचे पहिले पालक बनते आणि नंतर नॉन- कस्टोडिअल पालक बनते. स्मिताने याबाबत कोणालाही सांगितले नाही.”

आणखी वाचा – अवाढव्य खर्च, शाही थाटमाट अन्…; दिव्या अग्रवाल-अपूर्व पाडगांवकर यांचा विवाहसोहळा संपन्न, नववधूच्या लूकची होतेय चर्चा

या सर्व प्रकाराचा परिणाम त्यांच्या मुलींच्या मनावर आणि त्यांच्या अभ्यासावर होत असल्याचे नितीश यांनी सांगितले. ते म्हणाले की, “स्मितामुळे मुलींच्या शिक्षणाची फरफट होत आहे. दोघींच्याही भोपाळ व उटी या दोन शाळांमध्ये तब्बल ५ ते ६ महिन्यांचा खंड पडला. त्यादरम्यान मुलींनी अभ्यास केला की नाही हेदेखील माहीत नाही. मुलींच्या अभ्यासाबरोबरच मानसिक,शारीरिक व भावनिक अस्थिरता निर्माण झाली आहे.” नितीश आपल्या मुलींच्या बाबतीत खूपच भावुक असल्याचे दिसून येत आहे. तसेच आई-वडिलांच्या भांडणाचा विपरीत परिणाम होऊ नये यासाठी ते प्रयत्नही करत आहेत.

Tags: childrenchildren custodydivorcedivorce casesmita Bhardwajtelevision actor
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Vidya Balan Filed FIR

फेक अकाऊंट बनवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध विद्या बालनची पोलिसांमध्ये धाव, एफआयआर दाखल, नोकरी देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.