आमिर खान व किरण राव यांनी दोन वर्षांपूर्वीच विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २०२१मध्ये दोघांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतल्याचे जाहिर केले. त्यांच्या या निर्णयानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र घटस्फोटानंतरही आमिर-किरण एकत्र भेटत असल्याचं निदर्शनास आलं. इतकंच नव्हे तर आमिरची लेक आयरा खानच्या लग्नातही किरण एन्जॉय करताना दिसली. या लग्नामधील आमिर-किरणचे एकत्रित फोटो व व्हिडीओही व्हायरल झाले. पण अजूनही आमिरची पत्नी म्हणून तिला संबोधलं जातं हे किरणला पटत नाही. याचबाबत तिने आता भाष्य केलं आहे. (Kiran rao on aamir khan)
सध्या किरणचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट चर्चेत आहेत. या चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. याचनिमित्ताने किरणने ‘झूम’ शी संवाद साधला. यावेळी तिने आमिर व तिच्या नात्याबाबत भाष्य केलं. ती म्हणाली, “आम्ही दोन वर्षांपूर्वीच विभक्त झालो आहोत. पण आजही बाहेर फिरताना किंवा इतर सण समारंभामध्ये हजेरी लावल्यानंतर आमिर खान यांची पत्नी म्हणून संबोधतात. लोकांचे हे प्रेम आजही दिसून येत आहे. पण मला त्यांची ही चूक दुरुस्त करावी लागते आणि मी त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी असल्याचे त्यांना सांगते”.
आमिर व किरण राव यांच्या प्रेमाची सुरवात ‘लगान’च्या सेटवर झाली. या चित्रपटासाठी किरणने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहत होती आणि आमिर मुख्य प्रमुख भूमिकेमध्ये होता. तिथे ओळख झाल्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनीही निर्णय घेत ८ डिसेंबर २००५ मध्ये लग्न केले. त्यांना आझाद नावाचा मुलगा आहे.
पती-पत्नी या नात्याव्यतिरिक्त आमिर व किरण हे बिजनेस पार्टनर देखील आहेत. दोघेही प्रोडक्शन हाऊसमध्ये पार्टनर असून दोघांचेही कामाचे स्वरूप आणि पद्धत वेगळी आहे. किरणने याबाबत बोलताना सांगितले की, “आम्ही जेव्हा एकत्र काम करतो तेव्हा काम करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य असते. मी माझी कल्पकता दाखवू शकते आणि माझ्या कोणत्याही कामामध्ये आमिर हस्तक्षेप करत नाही. मी जर केवळ आमिरची पत्नी म्हणून राहील असते तर मला कदाचित नैराश्य आलं असते. तसेच माझी ओळख किरण राव म्हणून असणे मला अधिक महत्वाचे वाटते”. किरणने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये तिचं मत यावेळी व्यक्त केलं.