रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : मारलं, फोन खेचून घेतला अन्…; भर कॉन्सर्टमध्ये आदित्य नारायणची चाहत्याला विचित्र वागणूक, ‘तो’ प्रकार पाहून नेटकरीही भडकले

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 12, 2024 | 12:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aditya Narayan Troll

Video : मारलं, फोन खेचून घेतला अन्...; भर कॉन्सर्टमध्ये आदित्य नारायणची चाहत्याला विचित्र वागणूक, 'तो' प्रकार पाहून नेटकरीही भडकले

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण अनेकदा चर्चेत असतो. बरेचदा आदित्य ट्रोलिंगची शिकारही झालेला पाहायला मिळाला. यावेळी भिलाईच्या कॉन्सर्टमुळे आदित्य नारायण चर्चेत आला आहे. या कॉन्सर्टमधून त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका चाहत्याला मारताना आणि त्याचा फोन हिसकावून फेकताना दिसत आहे. चाहत्याबरोबरची ही त्याची वागणूक पाहिल्यानंतर त्याच्यावर सगळीकडून टीका होत आहे. (Aditya Narayan Troll)

आदित्य नारायण छत्तीसगडमधील एका कॉलेजमध्ये कॉन्सर्ट आयोजित करण्यासाठी गेला होता. यावेळी अनेक संगीतप्रेमी उपस्थित होते. या व्हायरल व्हिडीओमध्ये आदित्य शाहरुख खानच्या ‘डॉन’ चित्रपटातील गाणे गाताना दिसत आहे. यादरम्यान आदित्यचा संयम सुटतो. व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, आदित्य गाणं गात असताना त्याचा एका चाहता परफॉर्मन्स रेकॉर्ड करत होता. आदित्य नेमका कशामुळे नाराज झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र तो त्याच्या चाहत्यावर हात उगारताना दिसत आहे. आणि त्यानंतर त्याने त्याचा फोन हिसकावून फेकून दिला.

आणखी वाचा – मिथुन चक्रवर्ती यांच्या तब्येतीत सुधारणा, हॉस्पिटलमधील पहिला व्हिडीओ आला समोर, डॉक्टरांशी बोलताना दिसले अन्…

View this post on Instagram

A post shared by Shweta Agarwal Jha (@shwetaagarwaljha)

आदित्य नारायणचे हे वाईट वर्तन पाहून तेथे उपस्थित प्रेक्षकही हैराण झाले. त्याच्या या कृतीवर सोशल मीडियावरही जोरदार टीका होत आहे. लोकांनी नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळत आहे. एका यूजरने लिहिले आहे की, “आदित्य नारायणला काय प्रॉब्लेम आहे? एवढा गर्व कशाला? आपल्याच चाहत्यांचा इतका अनादर?”, तर दुसऱ्या यूजरने “तो स्वतःला काय समजतो?”, असा सवाल केला आहे.

आणखी वाचा – ऋषी कपूर यांच्या कुशीमध्ये दिसली रणबीर कपूर-आलिया भट्टची लेक, नीतू कपूर यांना भावना अनावर

या घटनेनंतर आदित्यच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील सर्व पोस्ट त्याने लपवल्या आहेत. आधी त्याचे चाहते सर्व पोस्ट पाहू शकत होते, परंतु आता त्याने त्याचे सोशल मीडिया अकाऊंट खाजगी केले आहे. सगळीकडून ट्रोल झाल्यानंतर आता आदित्य नारायण घडलेल्या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण देणार का?, याकडे साऱ्यांचा नजरा वळल्या आहेत.

Tags: Aditya Narayan concertAditya Narayan hits fanAditya Narayan Troll.Aditya Narayanentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Arshad Warsi On Wedding

लग्नाची अजब गोष्ट! अर्शद वारसीने २५ वर्षांनंतर लग्न केलं रजिस्टर, बायकोला खास सरप्राइजही दिलं अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.