बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने आपल्या दमदार अभिनयामुळे इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. अभिनेता मात्र प्रत्येक वेळी त्याच्या व्यक्तिरेखेवर प्रयोग करण्यात कधीही कमी पडला नाही. सैफला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायला फार कमी आवडतं. याशिवाय धर्माबद्दलही त्याने कधी भाष्य केलेलं पाहायला मिळालं नाही, मात्र एकदा त्याने त्याच्या धर्माबद्दल केलेलं भाष्य चर्चेत आलं. सैफ म्हणाला होता की, “तो खूप धार्मिक असल्यामुळे काळजीत आहे”. (Saif Ali Khan On Cast)
सैफ अली खानने धर्म व अध्यात्माबाबत आपले मत मांडले आहे. सैफ अली खानचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला असून त्याचे वडील प्रसिद्ध क्रिकेटर मन्सूल अली खान होते आणि त्याची आई बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर आहे. ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने सैफ अली खानने त्याच्या धर्माविषयी भाष्य केलं होतं. तो म्हणाला होता, “मी खऱ्या आयुष्यात अज्ञेयवादी आहे. मी धर्मनिरपेक्ष आहे कारण मला असे वाटते की खूप धर्म मला चिंतेत पाडतात कारण ते या जीवनावर नव्हे तर पुनर्जन्मावर जोर देतात”.
पुढे तो म्हणाला की, “मला वाटते की एक संघटना म्हणून धर्माला ओव्हररेट केले गेले आहे आणि अनेक समस्या आहेत, जसे की मुळात माझे देव, किंवा तुमचा देव किंवा कोणाचा देव चांगला आहे असं नसू शकतं”. सैफ अली खान पुढे असंही म्हणाला की, “जरी तो उच्च शक्तीच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत असला तरी नेमकी ती शक्ती काय आहे याची त्यांला कल्पना नाही. अज्ञेयवादी अशी व्यक्ती आहे जी देव अस्तित्वात आहे की नाही यावर निश्चितपणे विश्वास ठेवत नाही” असंही तो म्हणाला.
सैफ अली खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, सैफ अली खान शेवटचा ‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभास व क्रिती सेननबरोबर दिसला होता. या चित्रपटात त्यांने रावणाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड फ्लॉप ठरला. यानंतर सैफकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत, ज्यावर तो काम करत असल्याचं समोर आलं आहे.