शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आमच्या भावाचं नेमकं काय झालं हे…”, सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीला हवा आहे न्याय, अजूनही प्रकरण जैसे थे, म्हणाली, “आम्ही सीबीआयला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 5, 2024 | 11:44 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
sushant singh rajput sister

"आमच्या भावाचं नेमकं काय झालं हे...", सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीला हवा आहे न्याय, अजूनही प्रकरण जैसे थे, म्हणाली, "आम्ही सीबीआयला..."

बॉलिवूड अभिनेत्री सुशांत सिंग राजपूतच्या निधनाने साऱ्या सिनेसृष्टीला खूप मोठा धक्का बसला. अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण मात्र अस्पष्टच राहिले. दरम्यान सुशांत सिंहचा मृत्यू हा मुद्दा आता पुन्हा प्रेक्षकांसमोर आला आहे. अमेरिकेत राहणारी दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह कीर्ती सध्या मुंबईत आहे. तिच्या ‘पेन: पेन्स पोर्टल टू एनलाइटनमेंट’ या नवीन पुस्तकाच्या प्रमोशनच्या निमित्ताने ती भारतात आली आहे. यावेळी तिने दिलेल्या एका मुलाखतीने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. एका मुलाखतीत श्वेताने सीबीआयकडे सुशांतला न्याय देण्याची मागणी केली आहे. श्वेता म्हणाली की, जोपर्यंत या प्रकरणाचे सत्य सर्वांसमोर येत नाही, तोपर्यंत कोणालाही क्लोजर मिळणार नाही. (Sushant Singh Rajput Sister Demands)

‘इंस्टंट बॉलीवूड’ला दिलेल्या मुलाखतीत श्वेता म्हणाली, “आम्हाला जाणून घ्यायचे आहे की आमच्या लाडक्या सुशांतचे नेमके काय झाले. आणि हे आम्हा सर्वांना माहित असणे आवश्यक आहे आणि जोपर्यंत आपल्याला हे माहित नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. आपल्याला हे शोधून काढावे लागेल आणि या न्यायासाठी नेहमी याचना करत रहावे लागेल. आम्ही सीबीआयला सांगत राहू की, त्यांनी तपास सुरु ठेवावा आणि याचे लवकरात लवकर निकाल हाती यावेत”.

आणखी वाचा – गिरीजा प्रभूच्या नव्या घराबाहेरील आकर्षक नेमप्लेटने वेधलं लक्ष, कलाकारांकडून कौतुक अन्…; म्हणाली, “अखेर…”

श्वेताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या भारत भेटीचे काही व्हिडीओही शेअर केले आहेत. एका व्हिडीओमध्ये ती सुशांतच्या अपार्टमेंट माउंट ब्लँकच्या बाहेर उभी असल्याचे दिसत आहे. दरम्यान यावेळी तिच्यासह अनेक लोकांचा जमाव जमला असून प्रत्येकजण सुशांतला न्याय देण्याची मागणी करत घोषणाबाजी करताना दिसत आहे. याशिवाय काही व्हिडीओंमध्ये ती तिची मोठी बहीण राणी दीसह कन्याकुमारीच्या शिवमंदिरात जातानाही दिसत आहे.

आणखी वाचा – “खूप लाज वाटते अन्…”, संदीप रेड्डी यांच्या टीकेनंतर आमिर खानने पूर्वाश्रमीच्या पत्नीची घेतली बाजू, माफी मागत म्हणाला…

श्वेताने तिच्या ‘पेन’ या पुस्तकात सुशांतचा उल्लेखही केला आहे. तिने सांगितले की, सुशांत त्याच्या कामात व्यस्त होता पण असे असूनही श्वेता २०१४ ते २०१७ पर्यंत दरवर्षी तिला भेटायला येत असे. दुर्दैवाने, ती २०१८ व १९मध्ये सुशांतला भेटू शकली नाही आणि २०२० मध्ये, तिला भेटण्यापूर्वीच अभिनेत्याचे निधन झाले.

Tags: entertainmentsushant sing rajputsushant singh rajput deathsushant singh rajput sister
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Manjiri Oak talked about in interview that she was pushed from a train when she was 9 months pregnant

९ महिन्यांची गरोदर, विरार ट्रेनमधून ढकलून दिलं अन्...; मंजिर ओकने सांगितलेला 'तो' धक्कादायक अनुभव, म्हणालेली, "मार्केटिंगची नोकरी करताना..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.