Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ बाबत चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाचा शेवट अगदी जवळ आला आहे. येत्या २८ जानेवारी रोजी संध्याकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत हा शो टेलीकास्ट होणार आहे. अंकिता लोखंडे, मुन्नवर फारुकी, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा, अरुण माशेट्टी हे स्पर्धक फिनालेमध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे आता ‘बिग बॉस’ची ट्रॉफी कोणता स्पर्धक नावावर करणार याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान पहिल्या दोन क्रमांकावर अंकिता लोखंडे व मुन्नवर फारुकी या स्पर्धकांची नावे येत आहेत.
अशातच कलर्स वाहिनीने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. कारण या पोस्टमध्ये अंकिता लोखंडे देखील टॉप ३चा भाग नसल्याचं समोर आलं आहे. कलर्स वाहिनीने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही ट्रॉफी कोणाला द्याल? मन्नारा चोप्रा, मुन्नवर फारुकी की अभिषेक कुमार?”.
If given a chance, whom would you give the trophy to?
— ColorsTV (@ColorsTV) January 21, 2024
Munnara | Munawar | Abhishek#BB17 #BiggBoss17 #BiggBoss @BeingSalmanKhan #WeekendKaVaar
कलर्सने शेअर केलेल्या या पोस्टच्या ट्विटनंतर चाहते त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना पाठिंबा देत आहेत. दरम्यान कलर्सच्या ऑफिशिअल पेजवरून या तीन स्पर्धकांना टॉप ३ स्पर्धक म्हणून घोषित केले आहे. या पोस्टनुसार घडले तर अंकिताच्या चाहत्यांसाठी ही चांगली बातमी नाही. त्यामुळे शोचा विजेता कोण होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.
सध्या शोमध्ये टॉप ५ स्पर्धक आहेत. मंगळवारी शोमध्ये आठवड्याच्या मध्येच एलिमिनेशन टास्क झाला. यावेळी विकी जैनचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला. विकी जैन घराबाहेर गेल्याच्या बातमीने चाहते खूपच निराश झाले आहेत. सोशल मीडियावरही विकी जैनच्या समर्थनार्थ अनेक पोस्ट पाहायला मिळत आहेत.
आता ‘बिग बॉस’च्या या पर्वाच विजेतेपद कोण पटकावणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.