Bigg Boss 17 Latest News : सलमान खानचा रिऍलिटी शो ‘बिग बॉस १७’ आता ग्रँड फिनालेपासून काही पावले दूर आहे. येत्या २८ तारखेला या शोचा विजेता घोषित करण्यात येणार आहे. अंकिता लोखंडे, मुन्नवर फारुकी, अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी व मन्नारा चोप्रा हे पाच स्पर्धक फिनालेमध्ये पोहोचले आहेत. या सगळ्या दरम्यान, नुकत्याच झालेल्या भागात मुन्नवरने अंकिता लोखंडेसमोर सह-स्पर्धक मन्नारा चोप्राबद्दल धक्कादायक दावा केला असल्याचं समोर आलं आहे.
नुकत्याच समोर आलेल्या भागात मुन्नवर अंकिता लोखंडेबरोबर बोलताना दिसला. यादरम्यान त्याने मन्नाराच्या स्वभावाबद्दल सुरुवातीपासूनच माहित असल्याचे सांगितले. यानंतर मुन्नवरने धक्कादायक दावा करत अंकिताला सांगितले की, दिवाळीच्या रात्री मन्नाराने त्याला किस केलं होत. मुन्नवरने त्याच्या गालावर हात ठेवत संपूर्ण किस्सा सांगितला. याचा अर्थ असा की मन्नाराने त्याचे चुंबन घेतले होते. यावर अंकिताने तिने हे न पाहिले असल्याचे सांगितले. तेव्हा मुन्नवरने सांगितले की, “तिने हे कधीच कोणाला सांगितले नाही”.
पिंकविलाच्या वृत्तानुसार, मुन्नवर म्हणाला, “मी एक मर्यादा आखून ठेवली असल्यामुळे मी अस्वस्थ झालो”. तो म्हणाला, “मला तिला हे सांगायचे नाही कारण ते तिच्यासाठी त्रासदायक असेल”. मुन्नवर पुढे म्हणाला, “आम्ही रात्री सोफ्यावर बसलो होतो तेव्हा तिने दोन तीन वेळा डान्स चांगला होता असे सांगितले आणि मला विचारले, डान्स करताना तुला मज्जा आली का?, तर मी म्हणालो, ‘हो, मला मजा आली’. तथापि, त्याने असा दावाही केला की जेव्हा मन्नाराने नंतर त्याच्याशी या घटनेबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला समजले की तो याबद्दल चर्चा करण्यास तयार नाही.
मुन्नवरच हे बोलणं ऐकल्यानंतर अंकिता म्हणते की, “सलमान खाननेही मन्नाराला सांगितले होते की तिला मुन्नवर आवडते आणि हे त्यांनी बोलून दाखवलं कारण जेणेकरून ते प्रेक्षकांनाही पाहता येईल”. अंकितानेही मन्नाराला ‘पजेसिव्ह’ म्हटलं आहे. दरम्यान, ‘बिग बॉस १७’ सध्या त्याच्या ग्रँड फिनालेची तयारी करत आहे. सध्या अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, मुन्नवर फारुकी, अरुण माशेट्टी व अभिषेक कुमार यांच्यात ट्रॉफीसाठी स्पर्धा सुरु आहे.