शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : लग्नाला एक महिना पूर्ण होताच मुग्धा वैशंपायनने शेअर केला Unseen व्हिडीओ, पहिल्यांदाच दाखवला कसा पार पडला विवाह, चाहत्यांकडूनही कौतुकाचा वर्षाव

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 23, 2024 | 1:00 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate shared special video on the occasion of their 1 month wedding anniversary

Video : लग्नाला एक महिना पूर्ण होताच मुग्धा वैशंपायनने शेअर केला Unseen व्हिडीओ, पहिल्यांदाच दाखवला कसा पार पडला विवाह, चाहत्यांकडूनही कौतुकाचा वर्षाव

मराठीतील तरुण लोकप्रिय गायकांच्या यादीतील मुख्य दोन नावे म्हणजे गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन. छोट्या पडदयावरील ‘सारेगमप लिटिल चॅम्पस’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेल्या या जोडीने त्यांच्या गायनाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मुग्धा व प्रथमेश ही जोडी काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली. ‘आमचं ठरलं’ म्हणत एकत्र फोटो शेअर करत या जोडीने त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. प्रथमेश व मुग्धा यांनी त्यांच्या नात्याविषयी सांगितले तेव्हापासूनच त्यांच्या लग्नसोहळ्याकडे चाहत्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. (Mugdha Vaishampayan On Instagram)

अशातच २१ डिसेंबर २०२३ रोजी ही जोडी लग्नबंधनात अडकली. त्यांच्या लग्नाला मित्रपरिवार व कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. मुग्धा-प्रथमेश यांच्या लग्नाचे मुख्य आकर्षण होते ते म्हणजे त्यांचा साधेपणा.  दोघांनीही अत्यंत साधेपणाने व घरच्या घरीच त्यांचे लग्नापूर्वीचे विधी उरकले. त्यांचे लग्न पार पडताच सोशल मीडियावर अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळाले होते. अशातच आता मुग्धा-प्रथमेश यांनी त्यांच्या लग्नाची खास झलक दाखवणारा आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Mugdha Bhagawan Vaishampayan (@mugdhabhagawan5)

हेही वाचा – “‘बिग बॉस’ने माझी दोन घरं उद्ध्वस्त केली”, भर पत्रकार परिषदेत मुन्नवर फारुकीचे आरोप, म्हणाला, “या शोमध्ये…”

प्रथमेश-मुग्धा यांनी त्यांच्या सोशल मीडियावर लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या निमिताने खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला त्यांचा विवाहसोहळा ज्याठिकाणी पार पडला त्या हॉलचे दृश्य पाहायला मिळत आहे. यापुढे सप्तपदी, लग्नातील वऱ्हाड मंडळींची लगबग व मुग्धा-प्रथमेश एकमेकांना हार घालत असल्याचेदेखील पहायला मिळत आहे. तसेच व्हिडीओमध्ये मुग्धा व प्रथमेश यांचा लग्नातील खास लूकही पहायला मिळत आहे.

हेही वाचा – “मुलांच्या तोंडून स्वामीच बोलतात अन्…”, क्रांती रेडकरच्या लेकींनाही आहे स्वामी समर्थांचं वेड, अभिनेत्री म्हणाली, “छबील खेळत असताना…”

या संपूर्ण व्हिडीओला ‘डंकी’ या चित्रपटातील सध्या चांगलेच गाजत असलेले ‘ओ माही’ हे रोमॅंटिक गाणे लावण्यात आले आहे. तसेच हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की, “सर्वात शुद्ध व अनंतकाळापर्यंत कधीही न संपणाऱ्या या प्रवासाला एक महिना पूर्ण झाला आहे.” दरम्यान, या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.      

Tags: entertainment newsmarathi entertainmentmarathi entertainment newsmarathi singermugdha vaishampayanprathamesh laghateप्रथमेश लघाटेमनोरंजन बातमीमराठी गायकमराठी गायिकामराठी मनोरंजनमुग्धा वैशंपायन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Video : आधी अपमान, नको नको ते बोलला अन्…; विकी जैनने गुडघ्यावर बसून मागितली बायकोची माफी, म्हणाला, "चुका झाल्या आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.