Bigg Boss 17 Latest News : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय वादग्रस्त शो ‘बिग बॉस १७’ सध्या विशेष चर्चेत आहे. ग्रँड फिनालेच्या अगदी जवळ असलेल्या या शोची रंगत अधिकच वाढली आहे. काही दिवसांतच ”बिग बॉस १७’चा विजेता सर्वांसमोर येईल. आता शोमध्ये फक्त सहा स्पर्धक उरले आहेत. या स्पर्धकांना फिनालेपर्यंत पोहोचण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागला आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमुळे या शोचा नवा भाग अधिक खास होता.
‘बिग बॉस’च्या कुटुंबातील सर्व सदस्यांना मीडियाच्या कटू प्रश्नांना सामोरे जावे लागलेले पाहायला मिळालं. दरम्यान पत्रकारांनी विकी जैनवर अनेक आरोप केलेले पाहायला मिळाले. पण विकीने मीडियाच्या सर्व प्रश्नांना अतिशय धीटपणे उत्तरे दिली. एका पत्रकाराने विकीला विचारले की, “तु तुझ्या पत्नीसाठी कधी स्टॅन्ड घेणार?”. यावर उत्तर देत विकी म्हणतो की, “जेव्हा दोन बोलके लोक वाद घालतात, तेव्हा तो वाद वाढतच जातो”. तर दुसर्या रिपोर्टरने विकीला विचारले की “शो संपल्यानंतर तु व अंकिता कपल थेरपीसाठी जाणार आहात का? तर यावर विकी उत्तर देत म्हणतो, “थेरपी इथेच आहे. आता मी गुडघ्यावर बसून तिला सॉरी म्हणेन…”, यानंतर विकी गुडघ्यावर बसतो आणि अंकिताला म्हणतो, “माफ कर मंकू, माझ्याकडून चुका झाल्या, मला माफ कर”.
विकी पुढे असंही म्हणतो, “मला एक गोष्ट सांगायला आवडेल की आम्ही दोघे घरी एकटेच राहतो. त्यामुळे त्यावेळी तुमच्या चुका तुम्हाला सांगायला कोणीही नसतं आणि तुम्हाला कळतही नाही. आज या १०० दिवसांत जेव्हा प्रत्येकजण मला एकच प्रश्न विचारत आहे, त्यामुळे मी माझ्या भूतकाळातील सर्व चुकांचा विचार करत आहे, ज्या मला कधीच कळल्या नाहीत. आमच्यात काहीतरी चूक झाली आहे जी व्हायला नको होती”.
विकीला मुन्नवरबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. एका पत्रकाराने विचारले, “तु मुनव्वरला सांगितले की मी तुमच्यासारख्या २०० लोकांना कामावर ठेवले आहे, मग तुला नेमका कशाचा गर्व आहे?”, या प्रश्नाचे उत्तर विकीने अतिशय धाडसाने दिले. तो म्हणाला, “मला माझी पत्नी अंकिता लोखंडे व माझ्या कोळश्याच्या खाणीचा गर्व आहे”.