Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’चा फिनाले काही दिवसांवर आला आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांचा हा १०० दिवसांचा प्रवास आता काही दिवसांत संपणार आहे. अशातच अंतिम फेरीपूर्वी ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांना काही पत्रकारांना उत्तरे द्यावी लागली. ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांची नुकतीच पत्रकार परिषद भरली होती. यावेळी पत्रकारांकडून स्पर्धकांना घरातील त्यांच्या वागणुकीबद्दल काही प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. दरम्यान, या एपिसोडच्या प्रोमोमध्ये मुन्नवर फारुकीवर स्त्रियांचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केल्याचा आरोप लागवण्यात आला.
‘बिग बॉस १७’च्या प्रोमोमध्ये मुन्नवरवर गर्लफ्रेंड व ब्रेकअपबद्दल प्रश्नांचा भडिमार करत असल्याचे पाहायला मिळाले. या शोमुळे तू बदनाम झालास असे एका प्रसारमाध्यमाने म्हटले, तर ‘बिग बॉस १७’ मध्ये दिसल्यामुळे त्याच्या वैयक्तिक जीवनावर कसा परिणाम झाला हे सांगताना आयेशा खान दिसली होती. मुन्नवर वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून शोमध्ये आला होता. यावेळी त्याने त्याची मैत्रीण नाझिला सिताशीवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता.
यावर प्रतिक्रिया देत असताना, तो माध्यमांशी संवाद साधताना म्हणाला, “‘बिग बॉस’ने यावेळेस शोमध्ये तीन घरं बनवली आहेत आणि माझी दोन घरं उद्ध्वस्त केली आहेत”. दुसऱ्या एका पत्रकाराने मुन्नवरवर महिलांचा वापर करुन पुढे जाण्याचा आरोप केला. यावर आता मुन्नवर काय उत्तर देणार हे पाहणं रंजक ठरेल.
दुसर्या प्रोमोमध्ये, अंकिता लोखंडे व मन्नारा चोप्रा यांच्या घरातील प्रत्येक भांडणाच्या वेळी चारित्र्यावर शिंतोडे उडतील असं चित्र दिसतं असा प्रश्न विचारला, तेव्हा स्वतःबद्दल बोलताना अंकिता म्हणते, “जेव्हा मन्नाराला कोणाची तरी अडचण असते तेव्हा ती त्याच्यासाठी खूप घाणेरडी भाषा वापरते. मर्यादा न पाहता ती बोलत सुटते”. आता यावर मन्नारा काय उत्तर देणार हे पाहणं रंजक ठरेल. ‘बिग बॉस’मध्ये सध्या मुनव्वर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी, अंकिता लोखंडे, विक्की जैन हे स्पर्धक राहिले आहेत. आता यापैकी कोणता स्पर्धक ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकणार हे पाहणं औत्स्युक्याचं ठरणार आहे.