बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ती फार ओव्हरअ‍ॅक्टिंग…”. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची अंकिता लोखंडेवर आगपाखड, पोस्ट शेअर करत म्हणाली “चारित्र्यावरुन बोलणं…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 19, 2024 | 2:59 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
marathi actress gayatri datar slams on ankita lokhande, isha malviya and aayesha khan for character shaming on mannara chopra through Instagram story

“ती फार ओव्हरअ‍ॅक्टिंग...”. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची अंकिता लोखंडेवर आगपाखड, पोस्ट शेअर करत म्हणाली “चारित्र्यावरुन बोलणं...”

‘बिग बॉस’चे यंदाचे १७वे पर्व इतर पर्वांपेक्षा जरा अधिकच गाजले. या शोमधील घरातील स्पर्धकांच्या भांडणांमुळे व वादांमुळे ‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वाची चांगलीच चर्चा रंगली. अशातच नुकत्याच पार पडलेल्या एका भागात टास्कवरुन घरातील स्पर्धकांमध्ये जोरादार भांडण झाले. टॉर्चर टास्कदरम्यान, स्पर्धकांची दोन टीममध्ये विभागणी केली होती आणि यावरुनच ‘टीम’ ए व टीम बी यांच्यात जोरदार वाद झाला असल्याचे पाहायला मिळाले.

मुन्नवर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार व अरुण महाशेट्टी नॉमिनेशनपासून सुरक्षित आहेत आणि ते थेट अंतिम फेरीत गेले असल्याचे ‘बिग बॉस’ने घोषित केले. यानंतर अंकिता व ईशाने मन्नाराबरोबर वाद घातला आणि या वादात त्यांनी मन्नाराला काही अपशब्द वापरले. यावरुन सोशल मीडियावर आयेशा, ईशा व अंकिता यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. अशातच मराठमोळी अभिनेत्री गायत्री दातार हिनेदेखील सोशल मीडियाद्वारे अंकिता व मन्नाराची त्यांच्या वागणुकीवरुन चांगलीच कानउघडणी केली आहे.

गायत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत अंकिताविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये तिने असे म्हटले आहे की, “गेल्या काही आठवड्यांपासून अंकिता लोखंडेही प्रत्येक भागात फक्त आणि फक्त ओव्हरअॅक्टिंगच करत आहे. त्यामुळे तिला पाहणे हे आता खूपच त्रासदायक झाले आहे. ईशा व आयेशाबद्दल तर आता काही बोलूच शकत नाही. ईशा व आयेशाने मन्नाराच्या चारित्र्यावर बोलणे हे खूपच चुकीचे आहे. अंकिता, आयेशा व ईशा यांसारखे किंवा घरातील इतर कुणाच्याही मदतीशिवाय मन्नाराने तिचे या घरातील आपले स्थान टिकवले आहे.”

आणखी वाचा – काळे मणी अन् डायमंडचं पेंडंट…; अक्षया देवधरच्या नाजूक मंगळसूत्राची चर्चा, आहे फारच खास, युनिक डिझाईनने वेधलं लक्ष

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “मीसुद्धा १२ आठवड्यांपासून ‘बिग बॉस’मध्ये होते. पण मी कधीही कोणत्या मुलीला तिच्या चारित्र्यावरुन बोलले नाही. अंकिता व तिच्या २ मैत्रिणी (ईशा व आयेशा) यांनी ते राष्ट्रीय दूरदर्शनवर जे करत आहेत ते थांबवण्याची गरज आहे. टीव्हीवर एखाद्या व्यक्तीचे चारित्र्यहनन करून तिचा अपमान करणे हे अजिबात योग्य नाही.” तसेच यापुढे गायत्रीने मन्नाराला पाठिंबा दर्शवत तिला खंबीर राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “ते दोघेही माझे…”, शेफाली जरीवालाचा अंकिता लोखंडे व विकी जैनला पाठिंबा, म्हणाली “कुणीही जिंकलं तरी…”

दरम्यान, अभिनेत्री गायत्री दातार ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून घराघरांत पोहोचली. तसेच गायत्रीनेही ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात सहभाग घेतला होता. या शोमधील तिच्या खेळाची बरीच चर्चा झाली होती. अशातच तिच्या या पोस्टची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगत आहे.  

Tags: ankita lokhandeayesha khanbigg bossbigg boss 17 newsbollywood actressBollywood entertainmentBollywood entertainment newsentertainment newsgayatri datarisha malviyamannara chopramarathi actressअंकिता लोखंडेआयेशा खानईशा मालवीयगायत्री दातारबिग बॉसबिग बॉस १७ बातमीबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड मनोरंजनमनोरंजन बातमीमन्नारा चोप्रामराठी अभिनेत्री
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Vibhu Raghave Death
Entertainment

कॅन्सरमुळे निधन झालेल्या अभिनेत्याच्या अंतिम संस्काराला कलाकार रडले, सिनेसृष्टीतील जवळच्या मित्राने दिला खांदा, आजारपणातही केली होती आर्थिक मदत

जून 4, 2025 | 12:34 pm
Gurmeet Choudhary On Robbery
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी चोरी, घरकाम करणाऱ्या व्यक्तीनेच केला विश्वासघात, अभिनेता म्हणाला, “मुली सुखरुप आहेत पण…”

जून 4, 2025 | 11:51 am
Virat kohli anushka sharma viral video
Entertainment

१८ वर्षांनंतर हातात ट्रॉफी, बायकोला घटट् मिठी अन् विराट कोहलीला अश्रू अनावर, अनुष्का शर्माजवळ येताच…; व्हिडीओ व्हायरल

जून 4, 2025 | 11:47 am
IPL 2025
Entertainment

“१८ वर्षांची प्रतीक्षा संपली”, विराट कोहलीच्या RCB ला घवघवीत यश, कलाकरांकडून कौतुक, म्हणाले, “मेहनतीचं…”

जून 4, 2025 | 10:53 am
Next Post
Sunil Lahri On Ayodhya

अयोध्येतील दुरावस्थेबाबत 'रामायण' मालिकेतील लक्ष्मणाने व्यक्त केली खंत, अभिनेता म्हणाला, "दर्शन कसे घ्यावे हेच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.