बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

काळे मणी अन् डायमंडचं पेंडंट…; अक्षया देवधरच्या नाजूक मंगळसूत्राची चर्चा, आहे फारच खास, युनिक डिझाईनने वेधलं लक्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 19, 2024 | 2:54 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Akshaya Devdhar Mangalsutra

काळे मणी अन् डायमंडचं पेंडंट…; अक्षया देवधरच्या नाजूक मंगळसूत्राची चर्चा, आहे फारच खास, युनिक डिझाईनने वेधलं लक्ष

कलाकार मंडळींनी एखादी हटके फॅशन केली की त्यांचे चाहते ही ती फॅशन लगेचच फॉलो करतात. कपडे, दागिने अशा वेगवेगळ्या फॅशन ही कलाकार मंडळी करत असतात. आणि या फॅशनने ते प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडतात. अशातच पुन्हा एकदा एका हटके स्टाईलच्या मंगळसूत्राची चर्चा सुरु झाली आहे. अर्थात नववधूच्या गळ्यातील मंगळसूत्राच्या डिझाइनने ही चर्चा रंगली आहे. आणि या चर्चेला उधाण आलेलं पाहायला मिळालं. (Akshaya Devdhar Mangalsutra)

गेल्या वर्षभरात अनेक कलाकार जोड्या या लग्नबंधनात अडकल्या. दरम्यान या नववधूंच्या लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अशातच अभिनेत्रींच्या गळ्यातील मंगळसूत्र हे प्रेक्षकांसाठी अधिक खास ठरलं. कारण प्रेक्षक या हटके मंगळसूत्राच्या डिझाइन्स फॉलो करताना दिसले. आजवर ऋता दुर्गुळे, अभिज्ञा भावे, मिताली मयेकर, शिवानी रांगोळे या अभिनेत्रींच्या मंगळसूत्राची विशेष चर्चा रंगली. त्यानंतर आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या मंगळसुत्रचा डिझाईनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर.

आणखी वाचा – “एखादा सिनेमा आला पाहिजे”, चाहतीच्या मागणीवर प्रशांत दामले यांचं लक्षवेधी उत्तर, म्हणाले, “वयात आलो…”

अभिनेत्री अक्षया देवधर व हार्दिक जोशी यांनी २ डिसेंबर २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली ‘राणादा-पाठकबाई’ ही ऑन स्क्रीन जोडी ऑफ स्क्रीन एकत्र येत लग्नबंधनात अडकली. त्यांच्या लग्नाला दोन वर्ष झाली असून सध्या ही जोडी त्यांच्या वैवाहिक आयुष्याचा आनंद लुटत आहेत. नेहमीच दोघेही एकत्र फिरतानाचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “ते दोघेही माझे…”, शेफाली जरीवालाचा अंकिता लोखंडे व विकी जैनला पाठिंबा, म्हणाली “कुणीही जिंकलं तरी…”

अशातच अक्षयाने सोशल मिडियावरुन डिनर डेटचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोचं वैशिष्ट्य म्हणजे अक्षयाच्या गळ्यातील नवं मंगळसूत्र आणि त्या नव्या मंगळसूत्राची खास डिझाईन. अभिनेत्रीच्या मंगळसूत्रातील पेंडंट हे डायमंड्स (हिऱ्यांनी) भरलेल आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीच्या मंगळसुत्रात काळ्या मण्यांनादेखील तितकेच महत्त्वाचे स्थान दिले असल्याचे पाहायला मिळत आहे. अक्षयाचे हे सुंदर मंगळसूत्र पेंडंटसारखे असल्याचेही दिसत आहे.

Tags: akshaya deodhar actressakshaya devdharakshaya devdhar managalsutraentertainmentmarathi actressmarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
marathi actress gayatri datar slams on ankita lokhande, isha malviya and aayesha khan for character shaming on mannara chopra through Instagram story

“ती फार ओव्हरअ‍ॅक्टिंग...”. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची अंकिता लोखंडेवर आगपाखड, पोस्ट शेअर करत म्हणाली “चारित्र्यावरुन बोलणं...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.