कलाक्षेत्रातील मंडळींचा कलाकार होण्यापर्यंतचा प्रवास काही सोप्पा नसतो. प्रत्येकजण आपापल्या मेहनतीने त्यांच्या या क्षेत्रातील प्रवास पूर्ण करत असतात. बरेच कलाकार असे असतात ज्यांचा या क्षेत्रात कुणीही गॉडफादर नसतो, मात्र हे कलाकार स्वमेहनतीने स्वतःचं स्थान स्वतः निर्माण करतात. अभिनयक्षेत्रात येण्याची आवड त्यांना शांत बसू देत नाही तेव्हा कॉलेज विश्वामध्ये, शालेय जीवनात ही कलाकार मंडळी अभिनय क्षेत्राशी निगडित स्पर्धांमध्ये भाग घेत स्वतःला सिद्ध करत असतात. (Vanita Kharat Childhood Photo)
अशीच एक अभिनेत्री जिने या सिनेक्षेत्रात स्वतःचं स्थान स्वतः निर्माण केलं आहे. ती अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. वनिता खरातचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. वनिता खरात ही छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचली. ‘कोळीवाड्याची रेखा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनिताने तिच्या दमदार अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहे. त्यामुळेच आज तिचा स्वतःचा असा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. वनिताने केवळ मालिकेपुरतं मर्यादित न राहता आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला आणि त्यात प्रेक्षकांची मने जिंकण्यात तिला यश आले.
सोशल मीडियावरही वनिता खरात बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही पोस्ट करुन चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वनिताने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिने तब्बल दहा वर्ष जुना फोटो शेअर केला आहे. या पोस्टला तिने “या वनिताला आज खूप आनंद होत असेल” असं कॅप्शन दिलं आहे. वनिताने शेअर केलेला हा फोटो एकपात्री अभिनय स्पर्धेतील आहे.
दहा वर्ष जुना फोटो शेअर करत तिने तिच्या अभिनयक्षेत्राच्या प्रवासाच्या सुरुवातीची आठवण शेअर केली आहे. तिच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट व लाईक्सच्या वर्षाव केला आहे. समीर चौघुले यांनी कमेंट करत म्हटलं आहे की, “क्या बात है वनिता, खूप प्रेम आणि शुभेच्छा” असं म्हटलं आहे. तर ऋतुजा बागवे, अक्षया नाईक, रसिका वेंगुर्लेकर या कलाकारांनी तिच्या या फोटोवर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.